वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते.
नेत्यांची उपस्थिती (Ambedkarjayanti)
या वेळी मंचावर गृहराज्यमंत्री तसेच पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, रिपाई नेते विजय आगलावे, पत्रकार विनोद राऊत, अधिवक्ता डॉ विकास साठे, उद्योजक महेश गुल्हाने हे उपस्थित होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जंयती वर्धा शहरात अंत्यत उस्ताहाने साजरी झाली. या निमित्ताने 11 एप्रिल ते 14 एप्रिल असा चार दिवसाचे सांस्कृतिक तसेच प्रबोधनात्मक असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर शिक्षण विभागाचे काम सुरु असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगीतले.
डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्याआजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. खासदार अमर काळे यांनी आपल्या भाषणात जनसुरक्षा कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असल्याचे सांगून आंबेडकरी समाजाने या कायद्याविरोधात मैदानात उतरण्याचे आवाहन केले. या लढ्यात मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी लढणार असल्याचे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगीतले.

मेंदूची मशागत करणे हा मानवी अस्तित्वाचा मुख्य उद्देश असला पाहीजे हा बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आजच्या पीढीने अंगिकारण्याची आवश्यकता पत्रकार विनोद राऊत यांनी विषद केला. बाबासाहेबांनी आयुष्यात चौफैर अभ्यास केला त्यामुळे 21 व्या शतकात जन्मलेल्या बाबासाहेबांचे विचार 21 व्या शतकासाठी तेवढेत प्रासंगिक असल्याचे सांगत तरुणांनी वाचन, चिंतनावर भर देण्याचे आवाहन विनोद राऊत यांनी केले.

मुंबई हायकोर्टात अधिवक्ता असलेल्या डॉ. विकास साठे यांनी एक कायदेतज्ञ म्हणून बाबासाहेबांनी केलेल्या कामाला उजाळा दिला.गुन्हेगाराला मरेपर्यंत फाशीचा निर्णय देण्याची पंरपरा बाबासाहेबांच्या एका खटल्यातील युक्तीवादावरुन झाला याची त्यांनी आठवण करुन दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय आगलावे यांनी भारतात कुठेही खोदकाम करा त्यात बौध्द धर्माच्या खाणाखूणा हमखास सापडतात असे सांगत,बौध्द धर्मियांनी माणूसकीचे तत्व जपण्याचे आवाहन केले.
भरगच्च कार्यक्रम
सकाळ निळ्या पाखरांची हा पार्श्वगायिका श्रृती जैन यांचा संगीतमय कार्यक्रम चांगला गाजला.पहाटेचा या कार्यक्रमात शृती जैन यांनी एकाहून एक आंबेडकरी गाणी सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. महोस्तवाची सुरुवात महात्मा फुले जयंती दिनी मॅरेथॉन (Run For Equality) पासून सुरुवात झाली. 13 एप्रिलला रॉक बँड, तर संध्याकाळी गायक राहुल साठे यांच्या भिमवादनाने भिमजंयती उस्तवाची सांगता झाली.चार दिवसाच्या उस्तवाला वर्धेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.