कोल्हापुरः (allah muhammad) देशभरात बकरी ईद साजरी करण्यासाठी मुस्लीम धर्मियांमध्ये बोकडाला विशेष महत्व असते. या बोकडाच्या शरीरावर विशेष चिन्हं असली त्यांना लिलाव करुन मोठ्या किंमतीला विकले जात असते. अशाच एका बोकडाच्या कानावर अल्लाह, मोहम्मद लिहीलेला कोल्हापुरच्या बोकडाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सर्जा नावाच्या बोकडाला पाहण्यासाठी गर्दी (allah muhammad)
कोल्हापूरच्या सैनिक टाकळी परिसरातील प्रशांत शंकर गुरव यांच्याकडे ‘सर्जा’ नावाचे बोकड आहे. या बोकडाच्या शरीरावर विशेष चिन्हं आहेत. ही बातमी पसरल्याने मुस्लिम बांधवांसह इतर धर्मीय लोक या सर्जा बोकडाला पाहण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत.
बोकडाची किंमत २५ लाख
बकरी ईदच्या या बोकडाच्या उजव्या कानावर ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ ही दोन नावे जन्मतःच असल्याचं त्याचे मालक प्रशांत गुरव यांचे म्हणणे आहे. बोकडाच्या कानावर असलेल्या या नावामुळेच मालकाने त्याची किंमत तब्बल २५ लाख ठेवली आहे.