aata thambaycha naay“आता थांबायचं नाय” नव्याने जगण्याला दिशा दाखवणारा चित्रपट

Share

मुंबई : (aata thambaycha naay) वर्ष 2016 साली बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) चे काही कर्मचारी पुन्हा दहावीच्या परीक्षेला बसतात आणि चांगल्या मार्क्स ने पास देखील होतात. ही सत्य कथा चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक शिवाजी वायचळ ह्यांनी मांडली आहे. BMC म्हटले की घाण कचरा अस डोळ्यासमोर येत. पण त्या कर्मचाऱ्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. झाडू मारणारे कचरा वेचणारे म्हणजे घाणेरडे दारुडे असा समज काही लोकांमध्ये आहे. पण त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा प्रवास ह्या कर्मचाऱ्यांचा नक्कीच आहे. 

भरत, सिद्धार्थच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक (aata thambaycha naay)

चित्रपटातील एक एक पात्र आपल्याला हसवताना त्याचा जगण्याचा संघर्ष दाखवताना दिसतं, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव ह्यांच्या सारखे विनोदी कलाकार आपल्याला एक वेगळी भूमिका साकारताना पाहायला मिळतात, भरत जाधव ह्यांच्या भूमिकेचं सर्व जण कौतुक करत आहेत. कामगार जर शिकला आणि संघटित झाला तर तो त्याची बाजू ठाम पणे मांडू शकतो व त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराला नक्कीच वाच्या फोडू शकतो. BMC ने नव नवीन तंत्रज्ञान जरी विकसित केले तरी रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अनुभव कसा कामी येऊ शकतो हे देखील उत्तम रित्या मांडले आहे. 

एकापेक्षा एक उत्तम कलाकारांचा संगम

हिणवणुकीची वागणूक अपुरं ज्ञान होणारी हेटाळणी ह्या सगळ्यातून शिकण्याची जिद्द घेऊन रात्र शाळेत जाऊन हे कर्मचारी पुन्हा दहावीला बसतात व पास देखील होतात. एक हलका फुलका चित्रपट पण त्यातील एक एक पात्र आपल्याला आपल्यातील वाटायला लागतं चित्रपटामध्ये सखाराम मंचेकरच्या भूमिकेत भरत जाधव, मारुती कदमच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव, उदयकुमार शिरुरकरच्या भूमिकेत आशुतोष गोवारीकर, जयश्रीच्या भूमिकेत प्राजक्ता हनमघर, किरण खोजे अप्सरा म्हणून

रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे, ओम भुतकर – निलेश माळी( शिक्षक ), प्रवीण डाळिंबकर, रूपा बोरगावकर, किशोर बच्छाव, श्रीकांत यादव हे सर्व कलाकार पाहायला मिळतात चित्रपटाचं संगीत आणि चित्रीकरण देखील उत्तम झालं आहे. चित्रपट पाहिल्यावर तुम्ही देखील म्हणाल आता थांबायचं नाही.

लेखक : संदिप पालवे, +91 90821 54060 https://x.com/sandeeppalve1?s=21


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group