मुंबईः (Devendra Fadanvis) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेती धोरणाची घोषणा करून घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशी गोंडस योजना जाहिर केली खरी, प्रत्यक्षात राज्यातील रेती घाटांवर काय परिस्थिती असेल याची प्रचीती वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्रास सुरू असलेल्या वर्धा नदीवरील रेती घाटावर दिसून आली. खुद्द सत्ताधारी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर धाड मारून त्याचे लाईव्ह करत मुख्यमंत्री, महसुल मंत्र्यांना कारवाईचे आवाहन केले आहे.
अधिक वाचाः https://mahalakshvedhi.com/wardha-reti-mafiya-mla-dadarao-keche/
शितावरून भाताची परिक्षा ते हीच (Devendra Fadanvis)
राज्यातील हजारो रेती घाटांची संख्या आहे. प्रत्येक घाटावर स्थानिक राजकीय सत्ताधारी नेत्यांनी ताबा घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचे उदाहरण वर्धा जिल्ह्यातील आर्वी त्यानंतर हिंगणघाट तालुक्यात दिसून आले आहे. आधी शेकापुर बाई या घाटावर तब्बल ५ कोटींचा रेती साठा पकडण्यात आला. त्यानंतर आता आर्वीत थेट विधानपरिषदेच्या आमदारालानेच धाड मारून रेती माफियांना सळो की पळो केले आहे. त्यामुळे राज्यातील इतरही रेती घाटांवर काही वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही.
आमदार बनले महसुल अधिकारी
गेल्या दोन महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यात सर्रास रेती माफियाकडून अवैद रेती वाहतूक केली जात आहे. मात्र, त्यानंतरही महसुल अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आर्वी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी आमदार केचे यांच्याकडे रेती मिळत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर आमदारांनी थेट महसुल अधिकाऱ्यांच्या भुमीकेत जाऊन रेती घाटावर जाऊन लाईव्ह करत मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणविस आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कारवाईची मागणी केली आहे.
अधिक वाचाः https://mahalakshvedhi.com/pankajbhoyar-home-minister-wardha-palakmantri/
दोषी महसुल अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का ?
हिंगणघाट तालुक्यात सर्वाधीक रेती चोरी होणाऱ्या शेकापुर बाई घाटासह जिल्ह्यातील इतरही घाटांवरून अवैधरित्या रेती वाहतुक केली जात आहे. अशावेळी महसुल अधिकारी असलेल्या पटवारी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यासह इतरही पोलीस यंत्रणांवर कारवाई होईल का ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.
अधिक वाचाः https://mahalakshvedhi.com/retimafiya-higanghat-sdo-tahsildar-retimafiya/