मुंबईः (Wardha Reti Mafiya) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच रेतीधोरण जाहिर केले आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यात होत नाही. जिल्ह्यात एकूण ३६ पेक्षा जास्त अधिकृत घाट आहे. त्यामध्ये वर्धा नदीवर सर्वाधीक घाट असून, इतर वणा, यशोदा, पोथरा नदींवर सुद्धा रेतीचे घाट आहे. मात्र, यासर्व नद्यांना पोखण्याचे काम जिल्ह्यातील भाजपा नेत्यांकडून सर्रास केले जात आहे.
महसुल मंत्र्यांचाच भाजपा नेत्याला आशिर्वाद आहे का ? (Wardha Reti Mafiya)
महसुल धोरण जाहीर करून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याची घोषणा तर केली. मात्र, रेती डेपो तयार होऊनही त्याठिकाणची रेती माफियांकडून रोजरासपणे चढ्या दरात विकल्या जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील मोठा भाजपा नेता सक्रिय आहे. त्याला महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाच आशिर्वाद आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हाधिकारी तथा महसुल अधिकाऱ्यांवर दबाव
जिल्ह्यातील प्रत्येक घाटावरून अवैध रेतीची वाहतुक सुरू असतांना, अधिकाऱ्यांकडून मात्र, डोळेझाक केली जात आहे. कोट्यावधींची रेती माफियांनी लंपास केल्यानंतरही जिल्हाधिकारी आणि इतर महसुल अधिकाऱ्यांवर भाजपा नेत्यांचा दबाव आहे की काय ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हिंगणघाट तालुक्यात रेती चोरट्यांनी पोसले गावगुंड
भाजपा नेत्याकडून हिंगणघाट तालुक्यातील शेकापुर बाई घाटातून अवैध रेती उपसा केला जात आहे. उपसा करत असतांना, अधिकारी किंवा कोणीही घाटावर येऊ नये यासाठी घाटावर लक्ष ठेवण्यासाठी काही गावगुंड सुद्धा पोसण्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. परिणामी अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
भाजपा आमदार दादाराव केचेने संतापुन रेती घाटावर मारली धाड
आधी पुलगांव येथील पोलीस निरिक्षकांनी तब्बल ५ कोटींचा रेतीसाठा जप्त केला होता. त्यानंतर आता घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्याने आर्वी विधानसभा मतदार संघातील आमदार दादाराव केचे यांनी संतापून थेट रेती घाटावर धाड मारून रेती साडा पकडला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नद्यांना पोखरत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.