मुंबई ः (Prakash Ambedkar) पहलगाम काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटक मृत्यू पावले. सदर घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेनंतर देशात पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली आहे.
भारत सरकारने नरमाईची भुमीका घेऊ नये Prakash Ambedkar
या आतंकवादाला प्रत्युत्तर द्यायला केंद्रातील राजकीय नेतृत्व कच खात आहे पण, भारतीय सेना या आतंकवादाला निपटून काढायला सक्षम आणि तयार आहे. त्यामुळे भारत सरकारने आता नरमाईची भूमिका न घेता पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे प्रशिक्षण आणि सैन्य तळ नष्ट करावे आणि युद्ध झाले तरी ते करावे, यासाठी भारतीय नागरिक शासनाच्या सोबत राहतील.
या संदर्भात भुमीका स्पष्ट जाहीर करण्यासाठी येत्या 2 मे 2025 रोजी हुतात्मा स्मारक फोर्ट मुंबई येथे दुपारी २ वाजता एकदिवसीय शांततेत आणि लाक्षणिकरित्या भावना व्यक्त करण्यासाठी राजकीय पक्ष विरहित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी सामील व्हावे असे आम्ही आव्हान करीत आहोत. तसेच भारताने या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावे असे वाटते त्या सर्व सुजाण नागरिकांनी देखील आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.
सदर शांतता आंदोलनात भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन बसावे तसेच या कार्यक्रमात सर्व सामाजिक संघटना, एनजीओ /मंडळ इत्यादींच्या सहभागाचे देखील आम्ही स्वागत करीत आहोत.
वंचितचे आवाहन
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 2 मे 2025 पूर्वी या संदर्भात इतर कुठलाही कार्यक्रम आयोजित करू नये. तत्पूर्वी या संवेदनशील मुद्यावर कुणीही परस्पर भूमिका अथवा जाहीर वक्तव्य, मीडिया बाईट, बातम्या देऊ नये.