All Party Meeting ; सर्वदलीय पक्षाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची दांडी

Share

नवी दिल्ली : (All Party Meeting) जम्मू काश्मीरचा पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या बेछूट गोळीबारामध्ये २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली आहे. पर्यटकांचे धर्म विचारून दहशतवाद्यांकडून पर्यटकांना टारगेट करून त्यांना पॉइंट ब्लँक गोळी मारण्याच्या घटना घडली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान यांचा निर्णय अंतिम असतो. जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येते. मात्र, अशा आपत्कालीन परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीला दांडी मारली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली टीका (All Party Meeting)

जेव्हा देशातील सर्वपक्षाचे नेते बैठकीला उपस्थित असतात तेव्हा पंतप्रधान यांनी बैठकीला उपस्थित असणे आवश्यक होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान यांची उपस्थिती आवश्यक असते. कारण, त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. मात्र पंतप्रधान अनुपस्थित होते असे ट्विट खरगे यांनी केले आहे.

या विषयांवर झाली बैठकीत चर्चा

  • पहलगाम त्रिस्तरीय सुरक्षा असतानाही सुरक्षेत चूक कशी झाली. ज्यामुळे सर्वाधिक निर्दोष नागरिकांची हत्या झाली.
  • पहलगाम मध्ये गेल्या तीन दिवसात एक हजार पर्यटक आले होते. अशावेळी पोलिसांनी या वाढत्या पर्यटकांची संख्या आणि त्यांच्या सुरक्षेचा जबाबदारी घ्यायला पाहिजे होती.
  • जम्मू काश्मीरच्या सुरक्षेत आणखी वाढ कशी करता येईल .
  • या घटनेनंतर सरकारने ज्याप्रकारे पाऊले उचलायला पाहिजे होते. तसे पाऊले उचलण्यात आले नाही. 
  • सर्व पक्षाच्या नेत्यांनी बैठकीमध्ये या गोष्टींवरही एकमत केले आहे की, देशाच्या बाजूने जो ही निर्णय घेतला जाईल. त्यामध्ये एकत्र येऊ आणि सरकारला समर्थन करू 
  • पहलगाम मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांच्या विरोधात सरकारला पूर्ण समर्थन केले दिले जाईल.
  • अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. अशावेळी सरकारने याकडे सुरक्षेचा दृष्टीने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group