Maharashtra Transport ; डेप्युटी आरटीओच्या आशिर्वादाने इन्स्पेक्टरने सुटीच्या दिवशी दिडशे वाहनांना दिले फिटनेस प्रमाणपत्र

Share

मुंबई : (Maharashtra Transport) राज्याच्या परिवहन विभागात दर दिवशी घोटाळे, भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड होत आहे. राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे अड्डे झाल्याचे चित्र आहे. अशातच अंधेरी आरटीओ कार्यालयातील अजब- गजब प्रकरण पुढे आले आहे. तत्कालीन डेप्युटी आरटीओ यांच्याच आशिर्वादाने मोटर वाहन निरीक्षकांने चक्क सुट्टीच्या दिवशी 100 पेक्षा अधिक वाहनांना फिटनेस तपासणी प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. सुट्टीच्या दिवशीचे कोणतेही विशेष लेखी आदेश नसतानाही हा प्रकार झाला असल्याचे पुढे आले असल्याने परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी याप्रकरणी चौकशी अहवाल मागितला आहे.

फिटनेस प्रमाणपत्र देण्याचे नियम काय म्हणते (MaharashtraTransport)

वाहन फिटनेस प्रमाणपत्र देतांना उच्च न्यायालयातील 28/2013 या जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार अवजड वाहने व बसेस यांना दिवसाला किमान 25 ते 30 वाहनांनाच फिटनेस प्रमाणपत्र जारी करायचे आहे. हे करताना संबंधित तपासणी अधिकाऱ्यांनी त्या वाहनाला टेस्टिंग ट्रॅक वर चालवून बघायचे आहे. त्यानंरच वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र द्यायचे आहे. शिवाय, या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ सुद्धा काढायची असून, एकूण फिटनेस प्रमाणपत्र दिलेल्या वाहनांपैकी १० टक्के वाहने नियंत्रक अधिकारी यांनी पुन्हा तपासणी करण्यासंदर्भात मा. परिवहन आयुक्त यांचे आदेश आहेत. मात्र सुट्टीच्याच दिवशी या वाहनांना प्रमाणपत्र देतांना डेप्युटी आरटीओ यांनी यासंबंधीत कोणतीही प्रक्रिया पार पाडली नसल्याचे समजते.

पल्लवी कोठावदे तत्कालीन नियंत्रक अधिकारी (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी) यांचा याप्रकरणात सहभाग ?

मोटार वाहन निरीक्षक गुणवंत निकम यांना एआरटीओ पदाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा देण्यात आला आहे. यासंपूर्ण फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणात त्यांचे नाव पुढे येत आहे. निकम यांच्याकडून वारंवार वरिष्ठांच्या आदेशांवरुन तपासणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे तत्कालीन डेप्युटी आरटीओ पल्लवी कोठावदे यांनी मात्र याप्रकरणात आपला कोणत्याही प्रकारचा सबंध नसून,  शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणतेही विशेष आदेश दिले नसल्याचे सांगत हात वर केले आहे. त्यामुळे याप्रकरणात कोठावदे यांना वाचवण्याचा प्रयत्न परिवहन आयुक्त कार्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सुट्टीच्या दिवशी खैरातीसारखे वाटले फिटनेस प्रमाणपत्र 

1 ऑक्टोबर 2023 – 75

9 डिसेंबर 2023 – 68

27 जानेवारी 2024 – 96

18 फेब्रुवारी 2024 – 145

19 फेब्रूवारी 2024 – 75

24 फेब्रूवारी 2024 – 96

परराज्यातील बोगस प्रकरणातील गाड्यांना पण दिले फिटनेस प्रमाणपत्र

MH 02 FG 4753

MH 02 FG 5039

MH 02 FG 8051

MH 02 FG 8857

MH 02 FG 8858

MH 02 FG 9388

अंधेरी आरटीओ कार्यालयातील एजंट सागर गुळेकर कोण ?

सूत्रांच्या माहितीनुसार सुट्टीच्या दिवशी ज्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले. ते संपूर्ण सागर गुळेकर याच्या घरच्या कॉम्प्युटर मधून संबंधित अधिकारी निकम यांच्या लॉगिन आयडीवरून देण्यात आले आहे. याप्रकरणात सखोल तपास केल्यास गुळेकर याच्या घरचा पत्ता आणि कॉम्युटरचा आयपी एड्रेस सुद्धा सापडू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गूळेकर हा निकम यांचा एजंट असून, त्यांच्यासाठी संपूर्ण हेराफेरीचे काम करतो अशी अंधेरी आरटीओ कार्यालयात चर्चा आहे. मात्र, अंधेरी आरटीओ अधिकाऱ्यांकडून संपूर्ण चौकशी दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group