संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात साजऱ्या होणाऱ्या भीम जयंती महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले सहपत्नी अमेरिकेत दाखल झाले.
मुंबई / न्यूयॉर्क : विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्र संघ युनो च्या मुख्यालयात करण्यात आले आहे. दरवर्षी युनो च्या मुख्यालयात भीम जयंती चे आयोजन केले जाते. या भीम जयंती महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज अमेरिकेत दाखल झाले.
केनेडी विमानतळावर स्वागत
त्यांचे अमेरिकेत न्यूयॉर्क च्या जॉन केनेडी विमानतळावर अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी स्वागत केले. अमेरकेतील आंबेडकरी चळवळी कार्यकर्ते दिलीप मस्के आणि दीपक बन्सल यांनी रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे न्यूयॉर्क विमानतळावर स्वागत केले. अमेरिका दौऱ्यात रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सीमा आठवले आहेत.
तीन दिवस दौरा
रामदास आठवले हे 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून येत्या 18 एप्रिल रोजी भारतात परतणार असून मुंबई विमानतळावर त्यांचे सकाळी 11 वाजता आगमन होईल असे रिपब्लिकन पक्षा तर्फे कळविण्यात आले आहे.