मुंबई : बदलापूर येथील एका बालिकेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जनआक्रोशानंतर लगेच अक्षय शिंदेंचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर आता, कल्याणमधील चक्कीनाका भागातील बालिकेवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त करून सर्वसामान्यांकडून फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात असतानाच त्याने तळोजा तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आता पुन्हा गृहविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात येत होते प्रकरण
आरोपी विशाल गवळीला कठोर शिक्षा देण्याच्या दृष्टीने प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले होते. त्यासाठी सरकारी वकील म्हणून ॲड.उज्वल निकम यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच गवळीची आत्महत्या झाली आहे.
विशालवर यापूर्वीची 8 गुन्हे दाखल
विनयभंग,अनैतिक लैंगिक अत्याचार, चोरी, खुनाचा प्रयत्न, तडीपारीच्या आदेशाचा भंग करण्याचे अनेक गुन्हे विशालवार दाखल आहे. शिवाय,त्याचे तीन भाऊ श्याम,नवनाथ, आकाश हे सुद्धा सराईत गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत आहे.