मुंबई : रेती साठेबाजी रोखण्यात अपयशी ठरलेल्या तुमसरच्या एसडीओ आणि तहसीलदारांना निलंबित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. मात्र वर्धा जिल्ह्यात 5 कोटींच्या वर रेती चोरणाऱ्या रेती तस्करांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, मंत्रालयातील एका वरिष्ट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शेकापूर बाई येथील अधिकाऱ्यांवर कोणत्याही वेळेत कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घाटावरील संपूर्ण रेती चोरट्यानी लंपास केल्याच्या तक्रारी शासन दरबारी झाल्याचेही कळते आहे.
भाजपाचा नेताच रेती चोरीत लिप्त
वर्धा जिल्ह्यात आमदाराच्या आणि महसूल विभागाच्या आशिर्वादाने भाजपच्या महामंत्र्यांनी शेकापुर बाई या घाटावरून 5 कोटींच्या रेतीवर डल्ला मारला. काही वेळा थातुर मातुर कारवाई करून रेती तस्करांना अभय देण्याचे काम महसूल विभाग करत असल्याचं उघड आहे. मात्र इथे भाजपचा पदाधिकारी रेती चोर असल्यामुळे महसूल विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.
पोकलेनने 200 पेक्षा अधिक ट्रक रेतीची उचल
सध्या शेकापूर बाई या घाटावरून शेती उत्खनन बंद आहे मात्र दोन दिवसांनी रात्र पाळीत पुन्हा रेती चोरण्याचा मार्ग महसूल विभागानेच मोकळा करून दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रातोरात या नदीतून पोकलेनने 200 पेक्षा अधिक ट्रक रेतीची उचल होते. महत्वाचे म्हणजे सैटलाइट आणि ड्रोन च्या माध्यमातून घाटावरील रेती चोरीकडे लक्ष ठेवल्या जाते. शिवाय रात्र पाळीत उत्खनन करू नये असा शासन निर्णय असताना जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून बाहेर अवैध रित्या रेतीची वाहतूक होत आहे.
सामान्य जनतेची आर्थिक लूट
एकीकडे रेती तस्कर अधिक गडगंज होत असताना सामान्य जनतेला चढ्या दराने रेती विकत घ्यावी लागते. रेती धोरण जाहीर होऊन मोठा कालखंड झाला असला तरी अवैध रेती चोरींवर आळा घालण्यात शासन आणि प्रशासन सपशेल फेल ठरले आहे. सामान्य जनतेला 25 हजार रुपये प्रति ट्रक मागे मोजावे लागताहेत. त्यामुळे शासनाचा महसूल आणि पर्यावरणाची वाट लागत आहे.