वर्धा : वर्धेच्या तरोडा नजीक कारची ट्रकवर धडक बसल्याने वर्धेतील एका पोलीस कर्मचाऱ्यांसह अख्खं कुटुंब अपघातात संपल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि दोन मुलं असा चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने वर्धेत शोककळा पसरली आहे.
वर्धेच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असतांना रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झालीय. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे. यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका यांचा व मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचा मृतकांमध्ये समावेश आहे.
या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. तर वैद्य कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.