सायबर गुन्हे रोखण्यात मुंबई पोलीस दल सक्षम

Share

मुंबईः सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हाण असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला तसेच नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली असून पोलीस स्थानके ही जास्तीत जास्त लोकाभीमूख झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आझाद मैदान पोलीस स्थानकातील उत्कर्ष सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र हा सायबर गुन्हेगारी नियंत्रणामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून मुख्यमंत्री फणडीवस म्हणाले की, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याची मुंबई पोलीसांची क्षमता मोठी आहे. सायबर गुन्ह्याच्या एक प्रकरणात 12 कोटी रुपये वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. भविष्यातील सायबर गुन्ह्यांचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दलाने आतापासूनच अनेक उपक्रम हाती घेतले असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी महत्वाचे असलेले अत्याधुनिक तीन सायबर लॅब उभारण्यात आले आहे. या लॅबचे आज लोकार्पण करण्यात येत आहे.

डिजीटल अरेस्ट प्रकरणाचे सुशिक्षीत बळी

डीजिटल अरेस्ट सारख्या प्रकरणांमध्ये चांगले सुशिक्षीत लोकही पैसे देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुशिक्षीत असलेल्या डिजीटल अशिक्षीतांनाही शिकवण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्यासाठीही मुंबई पोलीस विविध उपक्रम राबवत आहे. त्यांच्या या उपक्रमात साथ देणारे अभिनेते अयुष्यमान खुराणा आणि निर्माते साहित कृष्णन यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारचे नवीन तीन कायदे फायद्याचे

केंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कायदे हे खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचे सांगून गुन्हे प्रकटीकरण, पुरावा याविषयीच्या कायद्यामुळे आता गुन्ह्यांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. गुन्ह्याच्या तपासकामी तंत्रज्ञान वापरासही आता परवानगी मिळालेली आहे. महिलांमध्येही आता बदल होत असून पुर्वी समाजिक दबावांमुळे महिलांविषयीच्या गुन्ह्यांची नोदणी कमी होती आता त्यामध्ये वाढ झाली आहे, ही एक चांगली बाब आहे. महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठीही आणि महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा यासाठी पोलीस स्थानकांमध्ये महिला व बाल सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे महिलांविषयीचे गुन्हे नोंदवताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही याची खात्री असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group