धर्माराजिका चक्रवात, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, भूपतिं, मौर्यराजा, अशोक, धर्माशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धर्मनायक सम्राट अशोक (इ.स.पू. 304 – इ.स.पू. 232) हे भारताच्या इतिहासातील सर्वात महान, शक्तिशाली आणि धर्मशील सम्राट मानले जातात.
चक्रवर्ती सम्राट अशोक – एक असा राजा ज्यांनी युद्धातून शांतीकडे, सत्ता तृष्णेतून धर्मनीतीकडे आणि विजयाच्या हव्यासातून मानवतेकडे वाटचाल केली. आज त्यांची जयंती साजरी करताना, त्यांची अहिंसा, करुणा, समता आणि लोककल्याणाच्या मूल्यांसाठी स्मरण केले जाते.
हेच मूल्य आपल्याला अजून एका पवित्र दस्तावेजात दिसतात – भारतीय संविधानात!
भारतीय संविधानाच्या शीर्षस्थानी असलेला अशोकस्तंभ, जो आज आपला राष्ट्रीय चिन्ह आहे, तो सम्राट अशोकाच्या तत्त्वांचा जिवंत पुरावा आहे. “सत्यमेव जयते” हा बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित मंत्र देखील अशोकांच्या विचारसरणीशी जोडलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत अशोकांच्या बौद्धिक वारशाचा आदरपूर्वक समावेश केला. समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, आणि सामाजिक न्याय ही मूल्ये म्हणजेच अशोकाच्या “धम्म” ची आधुनिक अभिव्यक्ती आहे.
अशोकांचा विशाल साम्राज्य उत्तर हिंदुकुश पासून दक्षिणेकडे मैसूरपर्यंत, आणि पश्चिमेकडील बलुचिस्तान, अफगाणिस्तान पासून पूर्वेकडील बंगाल, नेपाळ व म्यानमारपर्यंत पसरलेला होता. आजचा भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि म्यानमारचा मोठा भाग त्यांच्या साम्राज्याचा हिस्सा होता.
कलिंग युद्धातील भीषण नरसंहार पाहून अशोकांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाला. त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसा, शांती, सत्य आणि करुणा यांचा स्वीकार करून ते खरे धर्मसम्राट झाले.
सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार फक्त भारतातच नव्हे, तर श्रीलंका, थायलंड, अफगाणिस्तान, चीन, युनान आणि मिसरमध्येही केला. त्यांनी आपल्या पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्म प्रचारासाठी श्रीलंकेत पाठवले.
आजही भारतात अनेक ठिकाणी अशोक स्तंभ, शिलालेख आणि धर्मलेख पाहायला मिळतात – सारनाथ, बोधगया, कुशीनगर आणि लुंबिनी (नेपाळ) हे त्याचे साक्षीदार आहेत. त्यांनी स्थापन केलेली नालंदा, तक्षशिला आणि विक्रमशिला ही विद्यापीठं शिक्षणाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरली.
“चक्रवर्ती सम्राट” ही उपाधी भारतात फक्त अशोकांनाच लाभली आहे – ज्याचा अर्थ आहे “राज्यांवर राज्य करणारा सम्राट”. अश्या महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीनिमित्त ‘महालक्षवेधी’च्या वतीनेही विनम्र अभिवादन…!