वर्धा जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे. वाळू घाटांचा लिलाव झाला नसूनही कोट्यवधीची वाळू तस्करी शेकापुर बाई या नदीवरून सर्रास होत आहे. दिवसाला 100 ट्रक वाळूचा उपासा या घाटावरून होत असल्याचं चित्र आहे.
महसूल विभागाच्या आशिर्वादाने वाळू उपसा केला जातोय. स्थानिक पोलिसांनी वाळू उत्खननावर छापेमारी केली. मुद्देमालासह वाळू जप्त करण्यात आली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा वाळू माफियांनी उच्छाद मांडून वाळू तस्करी सुरू ठेवली.वर्धा जिल्ह्यातील 95 पेक्षा अधिक वाळू घाटांवर माफिया सक्रिय जिल्ह्यात तब्बल 95 पेक्षा अधिक वाळू घाट आहे. ज्यामध्ये 25 वाळू घाट 1 हेक्टर क्षेत्राचे असल्याने 25 वाळू घाट लिलावासाठी पात्र आहे. मात्र, शासनाने अद्याप वाळू घाटांचा लिलाव केला नसल्याने वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक घाटावर अवैध पद्धतीने कोट्यावधीचा महसूल बुडवून वाळू चोरी केली जात आहे.वाळू चोरीसाठी समृद्धी महामार्ग सोयीचावर्धा जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात वाळू तस्करी केली जात आहे. विशेषतः एकट्या हिंगणघाट तालुक्यातील शेकापुर बाई नदीवरील 5 कोटींपेक्षा अधिक किंमतीचा वाळूसाठा चोरट्यांनी लंपास केला आहे.जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिंन्हवर्धा जिल्ह्यातील वाळू उपसा साठ्यांवर लक्ष आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांची आहे. मात्र, खुद्द महसूल अधिकारीच याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील वाळू माफियांना महसूल अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे सांगण्यात आले आहे. शेकापुर बाई नदीवरील वाळू तस्करी होत असतानाही तहसीलदार योगेश शिंदे यांच्याकडून कुठल्याही प्रकाराची कारवाई होत नसल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.