शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

Share

मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात  याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

गुढीपाडवा नव्या शुभारंभाचा असं टीजरमध्ये सांगत हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांच्या अवमान प्रकरण, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. सोबतच पक्षांतर्गत कार्यकारणी मध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी मनसे पक्षाची काय असणार यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील.

मनसेची पुढील राजकीय दिशा कोणती ?

यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मनसे सैनिकांची गर्दी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group