देशाचे पंप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहे. त्यामुळे नागपूरात हिंसाचारच्या घटनेनंतर शहरातील ‘एक है तो सेफ हैं’ च्या बॅनर्सची सर्वत्र चर्चा आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सोबतच पंतप्रधान नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन (Dr. Hedgewar Smarak) परिसरात भेट देणार आहे. त्यावेळी संघाचे विद्यमान सरसंचालक डॉ. मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. संघाचे शताब्दी वर्ष सुरु असताना पंतप्रधानाच्या या दौर्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात करत जोरदार तयारी केली आहे. अशातच शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा स्वागत करणारे होर्डिंग नागपूर शहर आणि ग्रामीण भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांशी होर्डिंग वर ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा दिसून येत असून या बॅनर्सची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.
बहुतांशी होर्डिंग वर ‘एक है तो सेफ है’ ची घोषणा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक है तो सेफ है” ही घोषणा दिली होती आणि ती प्रचंड गाजली ही होती. विधानसभा निवडणुका पार पडून भाजप प्रचंड बहुमताने महाराष्ट्रात सत्तेत आलं. त्यानंतर आज (30 मार्च) जेव्हा पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर येत आहेत, संघस्थानी जात आहेत, तेव्हा पंतप्रधानांनी दिलेली “एक है तो सेफ है” ची घोषणा रेशीमबाग परिसरातील प्रत्येक बॅनर आणि होर्डिंग वर प्रकर्षणाने दिसून येत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा स्वागत करणारे होर्डिंग नागपूर शहर आणि ग्रामीण भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहे आणि त्यापैकी बहुतांशी होर्डिंग वर एक है तो सेफ है ही घोषणा दिसून येत आहे.
भाजपचं सर्वोच्च नेतृत्व आज संघस्थानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या नागपूर दौऱ्याची सुरुवात भाजपसाठी पितृ संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसरातून करणार आहे. भाजपचं सर्वोच्च नेतृत्व जेव्हा संघस्थानी पोहोचत आहे, तेव्हा ते संघ आणि भाजप यांच्या संबंधांसाठी महत्त्वपूर्ण दिवस तर आहेच. सोबतच देशाच्या राजकारण आणि समाजकारणावर ही या पंधरा मिनिटांच्या भेटीचे अनेकविध परिणाम येणाऱ्या दिवसात होणार आहे. पंतप्रधानांच्या ऐतिहासिक संघ भेटीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी संपूर्ण रेशीम भाग परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. ठिकठिकाणी बेरीकेडिंग करून आजवर कधी न पाहिलेली अशी जोरदार सुरक्षा व्यवस्था नागपूर पोलिसांनी संपूर्ण परिसरात लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संघ भेटीदरम्यान नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. गडकरी आणि फडणवीस पंतप्रधानांच्या दीक्षाभूमी येथील भेटीदरम्यानही उपस्थित राहतील.