मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाने रविवार (ता. ३०) रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.
ब्लॉक काळात, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
असा असेल ब्लॉक
ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत
मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/सेमी जलद गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील, या सेवा ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या/सेमी जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील या सेवा डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे स्थानकांवर थांबतील तसेच मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावर चालेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील.