तिवसा: पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिरजगाव मोझरी येथील बॅच सन. १९९१ ते १९९७ चे बालमित्र पंधरा वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला. शाळा, महाविद्यालय आणि त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन आपापल्या आयुष्यात व्यस्त झालेले प्रत्येक विद्यार्थी सहकुटुंब या कार्यक्रमात उपस्थित होते. विशेषतः शाळेत ज्या शिक्षकांचे संस्कार पडले अशा शिक्षकांनी सुद्धा यावेळी कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.

यावेळी उपस्थित मित्र, मैत्रिणींच्या आयुष्यातील घडामोडींची आदानप्रदान करण्यात आली. शिवाय, जुन्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. शाळेतील आठवणी करताना भावी आयुष्यात सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांनी अचूक मार्गक्रमण करावे यासाठी मार्गदर्शन केले शिवाय, हक्काने प्रत्येक विद्यार्थ्यांची पुन्हा कानउघडनी केली. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपण अजूनही शाळेतच बसलो असल्याची जाणीव झाली.
शिरजगाव मोझरी येथील स्थानिक मित्रांच्या कल्पनेतून साकार झालेला बालमित्रांचा गेट-टुगेदर अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. यावेळी श्री गुरुवर्य काकडे सर आदरणीय श्री मैदान सर आदरणीय श्री सोनवणे सर आदरणीय श्री नागपूर सर आणि , आदरणीय सौ नागपुरेमॅडम हे सगळे उपस्थित राहिले. आणि त्यांनी आम्हाला खूप चांगला मार्गदर्शन केलं काकडे सरांनी आम्हाला कविता म्हणून दाखवल्या.त्यांनी त्यांच्या वीस वर्षाचा अनुभव आम्हाला सांगितला.

दासटेकडीवर आयोजित हा स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आला. बालमित्र आणि मैत्रिणी यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि सरांनी सुद्धा खूप आम्हाला सुंदर आणि सोज्वळ मार्गदर्शन केले जुन्या आठवणीला उजाळा देणारा हा कार्यक्रम ठरला असल्याचे यावेळी प्रशांत शेंडे यांनी सांगितले.
