वर्हा जिल्हा परिषदेत काँग्रेसची अस्तित्वाची लढाई
अमरावती : कित्येक पंचवार्षिक वर्हा जिल्हा परिषद सर्कल मधील उमेदवारी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोझरीतच ठेवली. परिणामी जातीय ध्रुवीकरणात काँग्रेस उमेदवार कधीच निवडून येऊ शकला नाही. त्याचा फायदा सरळ-सरळ प्रहारचे संजय देशमुख यांना झाला आहे. हे अंतर्गत साठगाठ असेल किंवा नसेलही, अशातच अनुसूचित जातीसाठी राखीव जिल्हा परिषद निवडणुकीत शिरजगाव मोझरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिकीट मागितली असतांना, थेट तिवसा येथून दिलीप काळबांडे यांना आयात करून काँग्रेसने निवडणूक लढवली त्यातही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा काँग्रेस नेत्याचा मोझरीचा मोह राहतो की, इतर गावातील उमेदवारांना संधी मिळेल हे पाहण्यासारखं असेल
“खाली संज्या वर पंज्या”
वेळोवेळी काँग्रेस उमेदवारांचा फायदा सरळ संजय देशमुख यांना झाला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर “खाली संज्या वर पंज्या“ अशा समीकरणाची नेहमीच चर्चा होत असते. यावेळीही काँग्रेसचे नेतृत्व वरचे राजकारण करण्यासाठी चुकीचा आणि मोझरीतील उमेदवार देऊन संजय देशमुख यांच्यासाठीतर अंतर्गत काम केले जात नाही ना? अशा प्रकारची चर्चा सुरू आहे.
आमचे मत आजपर्यंत वाया गेले
वर्हा सर्कल मध्ये गेल्या ३० वर्षात काँग्रेस आपला उमेदवार निवडून आणू शकले नाही. अशापरिस्थितीत विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून येत असल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे, विकास रखडला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये आमचे मत वाया गेले अशा भावना बोलून दाखवत आहे.
शिरजगाव मोझरीत जिल्हा परिषद उमेदवारीची मागणी
कित्येक वर्षांपासून काँग्रेस सोबत एकनिष्ठ शिरजगाव मोझरीने काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस प्रतिसाद देऊनही उमेदवार निवडून आले नाही. त्यामुळे यावेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची संधी शिरजगाव मोझरी गावाला द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
चंद्रपाल तुरकाने पॅटर्न चालणार
यापूर्वी प्रहार पक्षावरून पहिल्यांदाच निवडून येत समाजकल्याण सभापती झालेले चंद्रपाल तूरकाने शिरजगावातूनच लिड घेत बहुमताने अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आले होते. शिरजगावात यंदा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास असाच शिरजगाव एकसंघ पॅटर्न चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसचा हे उमेदवार इच्छुक
- जसबीर ठाकूर – मोझरी गाव
- आकाश डेहनकर – गुरुकुंज मोझरी
- पंकज देशमुख- गुरुकुंज मोझरी
- सतीश पोजगे- मोझरी गाव
- प्रशांत कांबळे – शिरजगाव मोझरी
- संजय वानखडे (मार्डीकर)
