विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आश्वासन
पुणे : पुणे येथील माता रमाई स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील ४१ नंबरचे राष्ट्रीय स्मारक माता रमाई असेल यासाठी राज्यसरकारककडे बैठका घेत पाठपुरावा करू असे आश्वासन उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिला आहे. माता रमाई स्मारक पुणे येथील भेटी दरम्यान त्यांनी वक्तव्य केले आहे.
राज्यसरकारने महामानव डॉ. बाबासाहेबांनी उभारलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ९ संस्थां जतन करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधीची केलेली तरतूद ऐतिहासिक निर्णय आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याबाबत उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
माता रमाई स्मारक भेट कार्यक्रमात बोलताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे विधानसभा उपाध्यक्ष पदाची देणगी आपल्याला मिळाली.त्यांनतर डॉ. बाबासाहेबांचे वास्तव केलेल्या व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १८ वास्तू पाहण्याचे भाग्य मला मिळाले.तुमच्या आमच्या सारख्या अनुयायांनी त्या डॉ. बाबासाहेबांच्या वास्तू आजही जतन करून ठेवल्या आहेत यामध्ये शासनाचा तितकाच मोलाचा वाटा आहे.
राज्यातील ३९ स्मारकांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला आहे. तळेगाव येथील ४० वे राष्ट्रीय स्मारक उभारले जात आहे. अश्यात आपल्या मनातील श्रद्धास्थान माता रमाई भव्य स्मारक उभारणीसाठी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांची समिती सोबत भेट घेत, पाठपुरावा करत अधिकाधिक निधी मिळून देण्याची ग्वाही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली.
