एसडीजी -१७ सदैव जागतिक दर्जाचे, शाश्वत मानक तयार करण्याचा आणि त्यासाठी सर्व घटकांमध्ये भागीदारीचे महत्त्व स्पष्ट करणारा संदेश – अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, विधानसभा
पुणे : जागतिक मानक दिन २०२५ एसडीजी -17 अर्थात ध्येयांसाठी भागीदारी पुणेकरता केवळ एक उत्सव नव्हता, तर हा सदैव जागतिक दर्जाचे आणि शाश्वत मानक तयार करण्याचा आणि त्यासाठी सर्व घटकांमध्ये भागीदारीचे महत्त्व स्पष्ट करणारा संदेश होता असे वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले आहे. भारतीय मानक ब्युरो (बीएसआय), पुणे शाखा कार्यालयाने जागतिक मानक दिन २०२५ साजरा केला करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी हे वक्तव्य केले आहे.
विकसित भारत, मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत चे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये भारतीय मानक ब्युरो व त्यांच्या अधिकाऱ्यांचे, संशोधकांचे योगदान अमूल्य राहणार आहे.मानक हे फक्त नियमांचा संच नसून तो गुणवत्तेचा पाया आहे त्याने आपण तयार केलेली उत्पादने ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मानकाच्या बरोबरीचे असतील.त्यावर भारतीय उत्पादनवर Make in India न लिहता proudly up to indian standard या स्तरावर उत्पादन निर्मिती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.गुणवत्ता ही स्पर्धा नसून आपली जबाबदारी आहे या तत्त्वावर सर्व उद्योजकांनी काम करावे अशी सूचना यावेळी केली.
पुणे येथील BIS (भारतीय मानक ब्युरो) शाखेने या कार्यक्रमांचे परिणाम अत्यंत सकारात्मक राहिले असून पुढील वर्षांसाठी नव्या योजनांची आखणीही करण्यात आली आहे ही राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्षांनी व्यक्त केला.
मानकांचा अवलंब केल्याने SDG-१७ साध्य होण्यास कसे गती मिळू शकते यावर त्यांचे तांत्रिक सत्र सादर केले. या सत्रांनी शाश्वत आणि लवचिक औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी नवोपक्रम आणि पायाभूत सुविधांच्या भूमिकेबद्दल भूमिका उपस्थित मान्यवरांनी मांडली.
या कार्यक्रमात अर्चना कोठारी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे, विजय जाधव, संचालक, फिनोलेक्स प्लासन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि श्रीमती वसुधा केसकर, संचालक, मार्क्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड एस. डी. राणे, संचालक, BIS पुणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
