सिडको सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी ‘टाईम लाईन’ निश्चित करा

Share

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सिडको प्रशासनाला निर्देश

मुंबई: सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या ऑक्टोबर २०२४ मधील योजनेतील विजेत्या सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी कालमर्यादा (टाईम लाईन) निश्चित करावी, तसेच उत्कृष्ट दर्जाची घरे द्यावीत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला दिले आहेत.

विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात आज सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेतील घरांच्या अवाजवी किंमती कमी करण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सिडको महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधीआणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच, मानसरोवर, कळंबोली, पनवेल, खांदेश्वर, बामनडोंगरी, तळोजा व खारकोपर येथील सिडको सोडतीचे विजेतेही उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले, “ऑक्टोबर-२०२४ मधील घरांच्या अवाजवी किंमती कमी करण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच, विजेत्यांना घरकुलाचा ताबा वेळेत आणि लवकर देण्यासाठी रेराच्या (RERA) अटी-शर्तींच्या चौकटीत राहून निर्णय घेण्यात यावा.”

याव्यतिरिक्त, सिडकोने सामान्य नागरिकांचे हित लक्षात घेऊन सिडकोच्या प्रक्रियेतून बाद झालेल्या विजेत्यांना घरे मिळण्यासाठी पुन्हा संधीउपलब्ध करून द्यावी. तसेच, ज्या ठिकाणी इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी सदनिकांच्या विजेत्यांना प्राधान्याने ताबादेण्यात यावा, अशा सूचनाही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला दिल्या आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group