नवी मुंबई मनपाची बेलापूरमध्ये अतिक्रमणाविरोधी कारवाई

Share

महापालिकेने अनधिकृत बांधकामावर घातली गंडांतर

नवी मुंबई : तुषार पाटील 

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केली. वारंवार नोटीस देऊनही बांधकाम न हटवल्याने ही धडक मोहीम राबविण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

दिवाळे गाव, सेक्टर 14 मधील श्रीमती लक्ष्मी काशीनाथ बोस यांच्या घर क्र. 1215/02 या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू असल्याने एमआरटीपी कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटिशीची दखल न घेतल्याने अखेर बेलापूर विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहीम हाती घेण्यात आली.

या कारवाईसाठी सहा. आयुक्त डॉ. अमोल पालवे, सहा. अभियंता आत्माराम काळे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मजूर-10, हॅमर-03, गॅसकटर-01, पोकलन-01 यांसह पोलिस व सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

महापालिकेने पुढे देखील अशाच कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group