सुरुवातीला अपघात समजले जात होते प्रकरण; नंतर शरीरावर निघाले पंधरा ते वीस घाव
अमरावती : Senior police officer murdered शनिवारी संध्याकाळी अमरावती जिल्ह्यातील नवसारी परिसरात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सुरुवातीला अपघातात मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केल्यावर शरीरावरील शस्त्रांचे घाव बघून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
हत्येकरी अद्यापही पसार Senior police officer murdered
मृतक वरिष्ठ पोलीस अधिकारी कलाम भाई वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचा अधिकारी म्हणून त्याची ओळख होती. अशावेळी त्यांची हत्या का केली असावी या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, सध्यातरी आरोपी पसार झाले आहे.
पोलिसांकडून दोन पथकांची नियुक्ती
हत्येनंतर अमरावती पोलीस आयुक्तालयाने दोन पथकांची नियुक्ती केली आहे. दोन ही पथकांकडून कसून चौकशी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संशयित काही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आधी अपघात नंतर हत्या
एका चंद्रपूर पासिंग फोर व्हिलरने कलामभाई यांच्या टू-व्हिलरला धडक देण्यात आली. त्यानंतर कलामभाई दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर अज्ञात आरोपींनी कलामभाई यांच्या शरीरावर तब्बल २० घाव केल्याचे दिसून येत आहे.