corruption; सुशोभिकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार

Share

मुंबई : corruption मुंबईचे रस्ते,चौक सुशोभित दिसावे यासाठी मुंबई महानगर पालिकेने विविध रस्ते चौकांचे सुशोभिकरण केले त्या अंतर्गत भायखळा येथील डबेवाला कामगारांचे नेते मॅनेजमेन्ट गुरू कै.गंगाराम (बुवा) लक्ष्मण तळेकर चौकाचे नुतनीकरण करण्यात आले. 

९० टक्के काम जुनेच नूतनीकरणाचे १० टक्के काम निकृष्ट corruption

या चौकात वहातुक बेटा वरील चौथरा व त्यावर जेवणाचा डब्याची प्रतीमा आहे. येथे थातुर मातुर काम केले असे दाखवले आहे यात ९० टक्के काम जुने आहे तसेच्या तसेच आहे, नुतनीकरण केलेले १० टक्के काम ही निकृष्ट दर्जाचे आहे ते पण काम निखळून पडले आहे. सदरच्या कामा मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे हा भ्रष्टाचार ठेकेदार आणी महानगर पालिकेचे संबघीत अधिकारी यांचे संगनमताने झाला आहे.

चौकशीची मागणी 

या चौकाचे सुशोभिकरण करताना “ मुंबई डबेवाला असोशिएशन” यांचे कडून काही सुचना दिल्या होत्या हा चौक सुशोभित करताना त्या सुचना विचारात घेतल्या गेल्या पाहीजे होत्या पण त्या सुचना केराच्या टोपलीत टाकल्या गेल्या कारण चौकाचे काम फक्त कागदावरच केले आणी पैसे खाल्ले गेले आहेत. असा आरोप मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आरोप केला आहे.

या बाबत “ मुंबई डबेवाला असोशिएशन” यांचे कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे तक्रार करण्यात आली आहे त्यांनी जातीने या प्रकरणाची चौकशी करावी व कै.गंगाराम (बुवा) लक्ष्मण तळेकर हा चौक उत्तमरित्या सुशोभित करावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. सदर चौकात डबेवाला कामगार यांचे प्रतीमा लावाव्यात त्यावर विद्युत झोत सोडावा की जेणे करून हा चौक सुंदर दिसू शकेल.

मॅनेजमेन्टचे विद्यार्थी डबेवाला कामगारांच्या वितरण व्यवस्थे बद्दल अभ्यास करताना जेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतात तेव्हा हाजी अल्ली येथील डबेवाला कामगार पुतळा आणी या चौकाचा फोटो आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये आवर्जुन वापरतात.. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. परंतू ठेकेदाराच्या निकृष्ट कामाने या चौकाची दुराअवस्था झाली आहे. 


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group