१९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी ताब्यात
तुषार पाटील
नवी मुंबई : Mercedes hits scooter खारघर परिसरात शीव-पनवेल महामार्गावरील हिरानंदानी ब्रिजजवळ एक दुर्दैवी अपघात घडला. गोपाल यादव आणि रेखा यादव हे पती-पत्नी स्कूटरवरून नवीन पनवेलकडे जात असताना, बेलापूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीज बेंझ कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली.
पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी Mercedes hits scooter
या धडकेत रेखा यादव यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती गोपाल यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी खळबळ उडाली असून, खारघर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मर्सिडीज कार चालवणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले आहे. तीर्था सिंग असे तिचे नाव असून ती नवीन पनवेल परिसरातील रहिवासी आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.