illegal vehicles बेकायदा वाहन हस्तांतरण प्रकरणात कारवाई ऐवजी वाशीत नियुक्ती

Share

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचे दुर्लक्ष

मुंबई : illegal vehicles राज्याचे परिवहन आयुक्त कार्यालयात असलेल्या मुंबई उपनगरातील वसई आरटीओ कार्यालय कर्मचाऱ्यांचा लुटण्याचा अड्डा झाला आहे. बेकायदा वाहन हस्तांतरण करून लाखोंची माया गोळा करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्याऐवजी वाशी आरटीओ कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता हा वरिष्ठ लिपिक प्रकाश तेली वाशित आपली कशी भट्टी जमेल या तयारीत माया मिळवण्याची माहिती घेत असून, यामागे कोणाचे आशीर्वाद असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परिवहन आयुक्त अंधारात की, हेतूपुरस्पर दुर्लक्ष illegal vehicles

मुंबई उपनगरात असलेल्या वसई आरटीओ मध्ये दोन वरिष्ठ लिपिक प्रकाश तेली आणि निलेश जोशींनी चांगलीच माया गोळा केली आहे. प्रकरण उघड होताच आरटीओ सुट्टीवर पळाले. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी थातुर मातुर प्रकरणाची चौकशी केली. चौकशी अहवाल सुद्धा मागितला, दोन्ही वरिष्ठ लिपिक दोषी असल्याचे आढळून सुद्धा आलेत. मात्र निलंबन होण्याऐवजी प्रकाश तेलींना वाशी नियुक्ती मिळाली त्यामुळे तेलाच्या नियुक्तीमागे कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत असून, परिवहन आयुक्तांच्या भूमिकेवरही शंका परिवहन विभागातील अधिकारीच घेत आहे.

पालघर जिल्हा परिवहन सल्लागार सेवा प्रतिनिधी कामगार संघटनेचीही केंद्रासह राज्याकडे तक्रार 

प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई (एमएच ४८) या कार्यालयात वाहन संबंधित सर्व प्रकारची कामे केली जातात. महाराष्ट्रातील इतर परिवहन क्षेत्रात वाहन हस्तांतरण करता येत नाही. यासाठी ज्या ठिकाणी वाहन हस्तांतरण करायचे आहे त्याच क्षेत्रातील प्रादेशिक/उपप्रादेशिक कार्यालया मार्फत वाहन हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई (एमएच ४८) या कार्यालयात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक प्रकाश तेली, नीलेश जोशी यांनी अतिरिक्त लाच घेऊन इतर प्रादेशिक/उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अवैद्य पध्दतीने अनेक वाहनांचे हस्तांतरण केले आहेत.
या वाहनांचे केले बेकायदा हस्तांतरण 

MH48 AV 4852, MH48 AM 1053, MH48 AW 0604, MH48 CV 3751, MH48 CW 1962, MH48 CY 4145, MH48 CY 1861, MH01 AC 0452, MH48 CU 6540, MH48 BS 3730, MH48 CU 3143, MH48 Y 4730, MH04 EH 2088, MH04 FD 1545, MH04 HY 9757, MH48 AY 6729, MH48 BL 6484, MH48 BM 2497.

असेही गंभीर आरोप

दोन्ही वरिष्ठ लिपीकांनी इतर परिवहन परिक्षेत्रात वाहन हस्तांतरित केली आहेत. त्यादरम्यान दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि वाहनावरील कर्जाचा बोजा उतरवणे बाबतच्या नमुना अर्जावर वाहन हस्तांतरण केले आहेत. हा अवैद्य प्रकार असून अतिरिक्त लाच घेऊन चुकीच्या मार्गाने जवळ जवळ एक ते दीड हजारापेक्षा जास्त वाहनांचे अवैद्य पध्दतीने हस्तांतरण करण्यात आलेली आहेत. यातील काही वाहन क्रमांक वर नमूद करण्यात आलेली आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम करताना संबंधित नमुना अर्जावर सक्षम अधिका-याची सही असणे बंधनकारक आहे. परंतू वर उल्लेखीत कामातील वाहन हस्तांतरणाबाबत अनेक नमुना अर्जावर सक्षम अधिका-याची सही घेण्यात आलेली नाही असेही निदर्शनास आले आहे.

गुन्ह्याची प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना माहिती 

या प्रकरणी संपूर्ण माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना माहीत आहे. परंतु अजूनही संबंधित प्रकरणातील कर्मचारी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही अथवा कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केलेली नाही. या उलट संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप केला जात आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group