sand mafiya वाळु चोरी कोट्यवधीची आणि दंड लाखांचा

Share

वर्धा जिल्ह्यातील भाजपचा मुख्य सूत्रधार अजूनही कारवाई पासून मोकाट 

वर्धा: sand mafiya शेकापुर बाई, दरोडा या घाटावरून दहा कोटींच्या वर वाळू चोरी झाल्याच पुढे येत आहे. मात्र पीयूष इंफ्रा कंपनीला १४ लाखांचा दंड ठोठाऊन भाजपच्या मुख्य आरोपीला बाजुला सारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या घाटावरून कोट्यवधीचा माल चोरट्यांनी लंपास केलाय.

आमदाराच्या आशिर्वादाने भाजपच्या स्थानिक नेत्यांचं अवैध रेती उत्खनन अजूनही सुरूच sand mafiya 

अवैधरित्या ६३.१० ब्रास रेती साठवणूक प्रकरणी पीयूष इनफ्रा कंपनीला १४ लाख ५७ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. तहसीलदार योगेश शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. मात्र मूळ सूत्रधार अजूनही मोकाटच आहे. आमदाराच्या आशिर्वादाने भाजपच्या स्थानिक नेत्यांचं अवैध रेती उत्खनन अजूनही सुरूच आहे. दिवस आणि रात्र पाळीत पोकलेन आणि जेसीबीच्या माध्यमातून रेती उत्खनन केले जात आहे. या घाटावरून जवळपास शेकडो ब्रास रेतीच उत्खनन झाला आहे. आणि शेकडो ब्रास रेतीच्या उत्खननच काम सुरू आहे. 

याप्रकरणी वना नदी संवर्धन समितीच्या वतीने प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन केलेली कारवाई तटपूंजी असल्याचा आरोप करण्यात आला. पकडलेल्या ट्रक ला दिड लाखाचा दंड ठोठावण्यात येतो मग ६३ ब्रास रेती साठ्यांवर इतकाच दंड का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

या दोन घाटांवर राजरोसपणे सुरू असलेलं रेती उत्खनन तहसीलदार आणि आणि एसडीओ यांना माहिती असूनही कारवाई केली जात नाही. हफता घेऊनही रेतीचा ट्रैक पकडला जात असल्याचा आरोप करत एका तरच चालकांने तहसिल कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या धेड्याना का सोडून दिल जातय हा मोठा प्रश्न आहे. 

राज्यात अवैध रेती उत्खननावर धडक कारवाई सुरू आहे. मात्र वर्धा जिल्ह्यात मोठ्या नेत्यांच पाठवलं असल्यामुळे वणा नदीची वाट लावल्या जात आहे.

 


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group