harass two people; वनाधिकारी बायकोच्या सरकारी गाडीचा वापर करुन बडतर्फ अधिकाऱ्याचे दोन जणांना मारहाण

Share

नेत्वा धुरी

मुंबई: harass two people बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सरकारी वाहनाचा गैरवापर होत असल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.  उद्यानाच्या दक्षिण विभागाच्या विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांचे पती पवन पाटील यांनी उद्यानाबाहेरील लॉण्ड्रीच्या दुकानदारांना मारहाण केली. लॉण्ड्रीच्या दुकानाला भेट देताना त्यांनी रेवती कुलकर्णी यांना वनविभागाने देऊ केलेल्या सरकारी वाहनाचा वापर करत आपण सरकारी अधिकारी असल्याचा आव आणला. 

कृषी विभागातून पवन पाटील आधीच बडतर्फ harass two people

कृषी विभागात कार्यरत असताना पवन पाटील यांना बडतर्फ करण्यात आले आहे.  सरकारी वाहनाचा गैरवापर केल्याप्रकरणी उद्यान प्रशासनाने दक्षिण विभागाच्या विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणी रेवती कुलकर्णी यांनीही अधिकृतरित्या माहिती देण्यास टाळले. 

कपडे व्यवस्थित साफ न केल्यावरुन धरला राग 

कपडे व्यवस्थित साफ न केल्याचा राग मनात धरत पवन पाटील यांनी शनिवारी उद्यानाजवळील क्रिश ड्राय क्लिनर्स गाठले. यावेळी त्यांनी पत्नीची वनविभागाची गाडी वापरली. त्यांच्यासोबत रेवती कुलकर्णी पाटील यांना वनविभागाने देऊ केलेला चालकही होता. क्षणार्धातच पवन पाटील यांनी दुकानातील दोन जणांना मारहाण करण्यात सुरुवात केली. 

पैसे परत करण्याची धमकी 

सगळ्या कपड्यांचे पैसे द्या अन्यथा लॉण्ड्रीसाठी आलेले सर्व कपडे घेऊन जाणार अशी धमकीही दिली. त्यावेळी दुकानदाराने तीन हजार रुपये दिले. हे प्रकरण कस्तुरबा पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर पवन पाटील यांनी माफी मागून तीन हजार रुपये दुकानदारांना परत केले. ही सर्व माहिती दुकानदारांनी सांगितली. 

पवन पाटील सरकारी वाहनातून आले होते. लॉण्ड्रीच्या पावतीवर त्यांच्या नावाऐवजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव लिहिले गेले होते. पाटील सरकारी अधिकारी असल्याचा बडेजाव करत होते. आम्ही सर्व कपड्यांचे पैसे दिलेत. मारहाण करणे चुकीचे होते, अशी माहिती दुकानदारांनी दिली.

मारहाणीचा सीसीटीव्ही व्हायरल 

रविवारी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व्हायल झाल्यानंतर पवन पाटील यांचा कारनामा सर्वांना समजला. व्हिडिओतील वाहन वनविभागाचे वाहन असल्याबद्दल माहिती नाही, असे सांगत उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक आणि संचालिका अनिता पाटील यांनी सावधगिरीची भूमिका घेतली. संपूर्ण प्रकरण पाटील कुटुंबीयांचे वैयक्तिक प्रकरण असून, रेवती कुलकर्णी पाटील यावर अधिक भाष्य करु शकतात, असे सांगत सुरुवातीला मुख्य वनसंरक्षक आणि संचालिका अनिता पाटील यांनीही संपूर्ण प्रकरणावर माहिती देणे टाळले. 

वाहनाचा क्रमांक वनविभागाच्या वाहनाशी मिळताजुळता 

वाहनावरील क्रमांक हा उद्यानातील वाहनाशी जुळत असल्याचे लक्षात येताच आपण या प्रकरणी विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांच्याशी बोलल्यानंतर अधिकृत कारवाईबद्दल माहिती देऊ असे सांगितले. 

यापूर्वी उद्यानातील वनमजूरांना मारहाण

गेल्या तीन वर्षांत पवन पाटील यांनी उद्यानातील अनेक वनमजूरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत वैयक्तिक कामे करुन घेतली आहेत. पाटील कुटुंबींना सरकारी घराला देऊ केलेल्या वनमजूराकडून खासगी वाहने साफ करुन घेणे, घरकाम करुन घेणे असा प्रकार सुरु केला. पवन पाटील यांच्या अमानुष वागणूकीला कंटाळलेल्या वनमजूराने त्यांच्याविरोधात उद्यान प्रशासनाकडे लेखी तक्रारही केली होती. माझे काही अघटित घडल्यास पवन पाटील जबाबदार असतील असा इशाराही पत्रात दिला. १३ जुलै २०२४ रोजी संबंधित वनमजूराने हे पत्र लिहिले होते. या पत्राची उद्यान प्रशासाने वेळीच दखल घेतली असती तर पवन पाटील यांची मुजोरी वाढली नसती असे इतर तक्रारदार वनमजूरांनी सांगितले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group