sand mafiya; वर्धेतील महसूल अधिकारी लाच घेऊन अवैध ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा

Share

लहान ट्रॅक्टरधारकांवर कारवाई मात्र मोठे रेती तस्कर मोकाटच 

वर्धा : sand mafiya नुकतच वर्धा जिल्ह्यात एका ट्रॅक्टर चालकाने तहसीलदार कार्यालयात अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तहसीलदारानी अवैध रेती वाहतूक करत असल्यामुळे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. पण सगळे अधिकारी लाच घेऊनही कारवाई करत असल्याच त्या ट्रॅक्टर चालकाचं म्हणणं आहे. 

भाजपा नेत्याला सूट, छोट्या ट्रॅक्टर चालकांची धरपकड sand mafiya 

हिंगणघाट तालुक्यातील शेकापुर बाई, दरोडा या घाटावरून अवैध रित्या रेती उत्खनन गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. स्थानिक भाजपच्या नेता अवैध रेती उत्खनन करत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही. दिवसा ढवळ्या अवैध रेती वाहतूक होत असताना छोट्या ट्रैक्टर चालवणार कारवाई केली जाते. पण जिल्हा प्रशासनाचे मोठ्या रेती तस्करांकडे हात का पोहचत नाही हा मोठा प्रश्न आहे. 

महसूल अधिकारीच लाचखोर

अधिकारी हफ़्ते घेतात असा आरोप स्थानिक ट्रॅक्टर चालकांचा आहे. रेती तस्करांच्या जाळे खालपासून तर वरपर्यंत आहे. त्यात लहान अधिकाऱ्यां पासून तर मोठ्या नेत्यांपर्यंत हफ़्तेखोरी दिली जाते. घाटावर दिवसा ढवळ्या रेती चोरी होत असताना धाड टाकण्याचा नावाखाली एक दोन ट्रॅक्टर पकडून कोट्यवधीचा साठा सोडून दिल्या जातो. हिंगणघाट तहसीलदार आणि अल्लीपूर पोलिसांनी तेच केले. 

शेकापुर बाई आणि दरोडा घाटावरून कोट्यवधीचा माल पोखरला गेला. त्याच मूल्यांकन स्थानिक प्रशासनाकडून केले जात नाही. त्यांच्यावर पोलीस विभाग, महसूल विभाग कुठलीच कारवाई करत नाही. स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांचा आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. छोटी मोठी कारवाई केली जाते.

यावरून हफ़्तेखोरी आणि नेत्यांच वलय किती टोकाला गेले आहे यावरून स्पष्ट होते. महसूल विभागाच्या परवानगी शिवाय नदीतून रेतीचा एक कनही चोरीला जाऊ शकत नाही. नाहीतर गावकऱ्यांनी स्वतःच नदीतून रेती चोरून आपले घर बांधले असते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group