Construction house encroachment; हेंबाळ जलद्याळ गावात अतिक्रमण करून घराचे बांधकाम 

Share

गडहिंग्लज पोलिसांमध्ये तक्रार करूनही पोलिसांचे दुर्लक्ष 

कोल्हापूर : (Construction house encroachment) हेंबाळ जलद्याळ गावातील वसंत पाटील यांच्या घरच्या जागेवर अतिक्रमण करून जबरदस्तीने घर उभारणीच्या कामाची तक्रार गडहिंग्लज पोलिसांमध्ये केली आहे. मात्र , त्यानंतरही मारुती आणि अमर आळवणे यांच्याकडून अतिक्रमण करून घर बांधकामाचे काम सुरूच आहे. त्यानंतर आता ईश्वर आळवणे यांनी सुद्धा पाटील यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधकाम केले जात असल्याने वाद अधिकच वाढला असल्याचे दिसते आहे.

तक्रारदार वसंत पाटील यांच्याकडून वेळोवेळी समजावून सांगूनही आळवणे कुटुंब बेकायदेशीरपणे व घाईगडबडीने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय, जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. सदर मिळकतीच्या जागेची मोजणी करून मिळणेसाठी मोजणी खात्याकडे अर्ज केला असून त्याप्रमाणे मोजणीनंतर आळवणे कुटुंबियांनी बांधकाम करणे योग्य राहील असे पाटील म्हणाले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group