मुंबई : (engineer contractor association) राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांची 16 में रोजी जिल्हा नियोजन समिती पालकमंत्री कक्ष सोलापुरात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना चे शिष्टमंडळ वतीने भेट घेतली व बैठक झाली.
निविदाप्रक्रियेतील बेकायदेशीर गोष्टींचा वाचला पाढा engineer contractor association
यावेळी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र मधील जिल्हा परिषद मध्ये विकासाची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, ओपन कंत्राटदार यांना मिळत नाही. तसेच सर्व कामे कोर्टाचा निर्णयाचा अवमान करून बेकायदेशीर पणे ग्रामपंचायतीस देत आहेत तसेच जी कामे ई ऑनलाइन निविदा निघत आहेत. ती कामे सुद्धा व निविदा लोकप्रतिनिधी व राजकीय नेते प्रशासनावर प्रचंड दबाव आणुन नियमबाह्य पद्धतीने स्वताच्या पारड्यात पाडुन घेत आहेत. या सर्व गंभीर विषयाची माहिती व निवेदन त्यांना दिले.
या सर्व अन्याय विरोधात व सुबे अभियंता व ओपन कंत्राटदार यांच्या चरितार्थ व व्यवसाय वर गदा येत आहे. यामुळे आम्ही मुंबई हायकोर्ट मध्ये दिनांक 18 एप्रिल रोजी याचिका दाखल केली आहे. याचीही त्यांना कल्पना दिली यावेळी या सर्व गंभीर विषयाची दखल त्यांनी घेतली व याबाबत तातडीने मुंबईला मंत्रालय मध्ये बैठक आयोजित करून या सर्व गंभीर विषयावर आपण एकत्रित बसुन मार्ग काढु असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना चे शिष्टमंडळ व राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांना ग्रामविकास मंत्री यांनी दिले आहे.