sand mafia ; प्रशासन, सत्ताधाऱ्यांची रेती माफियांना खुली छुट

Share

वर्धा : (sand mafia) अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एक-दोन ट्रकांवर कारवाई करून रेती उत्खनन होत असलेल्या घाटांवर कारवाई होत नाहीत. शेकापुर आणि दरोडा या घाटावरून दररोज 100 पेक्षा अधिक रेतीचे ट्रक बाहेर पडत असताना शासन मात्र गप्प आहे. 

कोट्यवधींची रेती माफियांचा डल्ला sand mafia

हिंगणघाटच्या शेकापुर बाई, दरोडा या घाटावरून अवैध रीत्या रेती उत्खनन सुरू आहे. कोट्यावधीची रेती तस्करांनी घशात टाकली असून अजूनही रेती उत्खनन केले जात आहे. महत्वाच म्हणजे रेतीची वाहतूक रस्त्याने होत असतानाही पोलीस आणि महसूल विभागाला दिसून पडत नाही हे मोठ आश्चर्य आहे. 

आमदार समीर कुणावार यांच्या मतदार संघात उच्छाद 

महाराष्ट्रात भाजपच सरकार आहे. अवैध रेती उत्खननाला आळा बसावा यासाठी कठोर कायदे करण्यात आले. मात्र भाजपच्या नेत्यांकडूनच या कायद्याची पायमल्ली केली जात आहे. आमदार समीर कुणावार यांच्या विधानसभा मतदार संघात रेती तस्करांचे उच्छाद मांडला आहे. 

सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने रेती माफिया इतके निर्धावले आहे की जालना जिल्ह्यात रेती माफियांनी तहसीलदारावर हल्ला चढवला. स्वरक्षणासाठी तहसीलदाराना हवेत गोळीबार करावा लागला. सत्ताधाऱ्याना रेती तस्करांच्या मुसक्या आवळणे इतका अवघड आहे का?. जर सत्ताधारी रेती माफियांना पाठीशी घालत असेल तर सामान्य जनतेने न्याय मागायला जायचे कुठे असा प्रश्न आहे. रेती डेपो नंतर सामान्य जनतेला स्वस्त दरात रेती मिळेल अशी अपेक्षा होती मात्र दहापट पैसे मोजून जनतेला रेती विकत घ्यावी लागते. एकीकडे सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे तर दुसरीकडे रेती माफिया चांगलेच गलेलठ्ठ होत आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group