काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट
मुंबई : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर Congress Shivsena
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही एक शिष्टाचार भेट होती, यावेळी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे. प्रबोधन ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे हे सांगितलेले आहे. ‘देवांचा धर्म व धर्माची देवळे’ पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आज भाजपा धर्म बुडवायला निघाला आहे. भाजपा लोकशाही व संविधान विरोधी आहे.
लोकशाही, संविधान व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढ्यात आगामी काळात सोबत राहणे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसुचना निघाल्यावर मित्र पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी लोणार सरोवराची फोटोग्राफी असलेले एक पुस्तक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे फटकारे व पंढरपूरच्या वारीची फोटोग्राफी असलेले पुस्तक त्यांनी भेट दिले तर मी उद्धव ठाकरे यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावरील पुस्तक भेट दिल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.