मुंबई : (Maharashtra Mantralay) महाराष्ट्रातील जनता जवळपास १२ ते १४ कोटी या सर्व जनतेचे महत्त्वाचे व मुलभूत सुविधा, प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मुंबई येथे असलेले मंत्रालयाची इमारत व त्यामधील काम करणारे प्रशासन व राज्यकर्ते यांनी आता राज्यातील जनतेवरच मंत्रालय मध्ये आपले कामे घेऊन येणारे जनता यावरच आता प्रवेशावर बंधने घातली आहे ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात सामान्य जनता Maharashtra Mantralay
आज राज्यभरातून आपले कामे घेऊन येणारी जनता संख्या ही भरपूर आहे तसेच ती जनता भोळी भाबडी आपले स्वताचे व आपल्या कुटुंबांचे कामे व्हावी आपल्या जिवनाचा रोजचा गाडा व्यवस्थित चालावा हा या पाठीमागे हेतू आहे. परंतु राज्यकर्ते व प्रशासनाने जनतेच्या मुलभूत हक्कावरच घाला घातला आहे असे स्पष्ट दिसत आहे.
सकाळ पासून रांगेत उभा रहायचे तसेच काही एप्लिकेशनवर डाऊनलोड करायचे तसेच सगळ्यांना दुपारी २ पासुन आत अक्षरक्ष ओढाताण करून एकदम प्रवेश द्यायचा एकाच वेळी एवढ्या जनतेला एकदम आत सोडल्याने जिथे ज्यांचे काम आहे. तेथील टेबलवर काम करणाऱ्या कर्मचारी समोर अक्षरक्ष तुडुंब गर्दी असते. तसेच एवढी गर्दी असल्याने कर्मचारी काम ही एवढ्या लोकांचे करू शकणार नाही. तसेच जनतेला सुद्धा ज्या दिवशी काम आहे त्याचवेळी जर जनतेचे काम नाही झाले, तर मग एक दिवस मुंबई मध्ये राहण्यासाठी फारच अडचणी जनतेला निर्माण होत आहेत.
अशा अनेक अडचणींमुळे राज्यकर्ते व प्रशासनाने हा मंत्रालयामधील ठराविक वेळेची भरपूर बंधने असलेली जनतेची गळचेपी करुन सदर काम न होण्यासाठी व जनतेलाच प्रशासनचे कर्मचारी व अधिकारी व राज्यकर्ते यांना आपल्या कामाचे गाव्हाणे मांडण्यासाठी व भेटण्यासाठी वेळच न देणे ही फार मोठी घोडचूक शासन करीत आहेत असे स्पष्ट दिसत आहे. यासाठी कोणत्याही दिवशी सकाळी ९ पासुनच ही मंत्रालय मध्ये आत सोडण्याची प्रक्रिया सुरू करणे हेच सदृढ लोकशाही साठी गरजेचे कर नाही तर डर कशाला या म्हणीप्रमाणे काम होणे गरजेचे आहे.
तरच आपली लोकशाही जिवंत आहे हे सिद्ध होईल, ज्या गरीब जनतेनी तुम्हाला राज्यकारभार हातात दिला तसेच कर रूपाने आर्थिक डोलारा उभा केला त्याच जनतेला तुम्ही त्रास देत असाल तर जनता सुद्धा पुढील निवडणुकीत अथवा या तातडीने जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात मंत्रालय मध्ये २४ बाय ७ प्रवेश दिला जाईल असा ठराव समंत करेल त्यालाच पाठिंबा देईल.हीच गोष्ट पुढील काळात आधोरिखेत होईल हे मात्र निश्चित.