आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का ?
मुक्ताईनगर: (foxconn project) महाराष्ट्राच्या हातातून निसटलेला बहुचर्चित फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आता थेट उत्तर प्रदेशच्या झोळीत पडला आहे. यावरून आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का ? असा सवाल केला आहे.
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा सवाल foxconn project
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला आहे. प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ हजार ७०६ कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून उत्तर प्रदेशातील २ हजार नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
आधी महायुती सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरात देऊन गुटगुटीत केले, आता उत्तर प्रदेशला पुरवले जात आहे. एक काळ होता लोक महाराष्ट्रात लोक रोजगारासाठी यायचे. आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या असं सरकारला वाटत आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.