डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करत इर्विन चौकात फटाके फोडून, लाडु वाटप केले.
अमरावती : (Chief Justice of India) अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश.. अमरावतीत लड्डू वाटप फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या माल्यार्पन करत आनंद साजरा केला.
अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा Chief Justice of India
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नंतर अमरावतीला दुसरे महत्त्वाचे पद मिळाले आहे. अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रोपती मृर्मु यांच्या हस्ते शपथ घेतली. भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतातच अमरावतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावतीकरांनी फटाक्याची आतषबाजी करत एकमेकांना लड्डू वाटप करत जल्लोष करण्यात आला. भूषण गवई यांच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, अमरावतीकर देशाच्या सर्वोच्च मोठ्या पदावर जातो याचा सार्थ अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया अमरावतीकरांनी दिल्या.