नांदेड : (savta parishad) सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान सचिव डॉ.राजीव काळे, प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सावता परिषद प्रदेश कार्यालय मरिन ड्राईव्ह मुंबई येथे 9 मे रोजी सावता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले असून नादेड जिल्हाध्यक्षपदी सुनिल बालाजीराव शिंदे सिडको नवीन नांदेड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नियुक्तीच्या निमित्ताने सत्कार (savta parishad)
तर जिल्हा कार्याध्यक्षपदी संदीप राऊत, तुळशिराम वाडगुरे, महानगराध्यक्ष बालाजी बनसोडे, हिंगोली जिल्हा प्रभारी अध्यक्ष ॲड.केतन सारंग यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सावता परिषद नांदेड जिल्हा शाखेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 11 मे रोजी सायंकाळी ठिक 6 वाजता सावित्रीबाई ज्योतीराव फुले पुर्णाकृती पुतळा आयटीआय चौक नांदेड येथे हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत, पंचायत समिती मुदखेडचे माजी सभापती लक्ष्मणराव जाधव, जिल्हा प्रवक्ता मारोती शितळे, युवा महानगराध्यक्ष संदीप झांबरे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, भाजपा युवा मोर्चा महानगराध्यक्ष माधव शिरसाठ, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, रामदास पेंडकर (गुणवंत कामगार), नितेश माटे, ज्ञानेश्वर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या नुतन पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पहार देवून ह्दय सत्कार व अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वरील सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरखनाथ राऊत यांनी मांडले. याप्रसंगी सावता परिषद नांदेड जिल्हा शाखेचे पदाधिकारी व समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.