पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुनम महाजन असलेल्या बॅनरवर उलटा तिरंगा वापरण्यात आला.
मुंबई : (insult of tiranga) वांद्रे पुर्व विभानसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी खासदार पुनम महाजन यांचा फोटोचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामध्ये मिशन सिंदुर राबवल्याने भारतीय सेवेच्या सर्व विर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या बॅनरवर उलटा तिरंगा छापण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय तिरंग्याचा अपमान झाल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे.
माजी खासदार पुनम महाजनांनी माफी मागावी insult of tiranga
भारतीय सैन्य दल पाकिस्तानशी लढत असताना देशातील सर्व पक्ष सरकारच्या व सैन्यदलाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत पण भाजपा मात्र श्रेय घेण्याचे पाप करत आहे. भाजपाच्या माजी खासदार पुनम महाजन यांनी राजकीय बॅनरबाजी करताना मोदी, शाह , फडणवीस व भाजपा नेत्यांचे फोटो बॅनरवर झळकवले आहेत आणि भारताचा तिरंगा उलटा दाखवून तिरंग्याचा अपमान केला आहे. भाजपाला भारताच्या तिरंगी झेंड्याबद्दल कधीच प्रेम नव्हते व आताही नाही हे दिसत असून तिरंग्याचा अपमान करणाऱ्या पुनम महाजन यांनी माफी मागावी, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.