stoppage of firing; ब्रेकिंग न्युजः भारत आणि पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा

foreign-secretary-vikram-misri
Share

आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी सहमती; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली.

मुंबईः (stoppage of firing) भारत आणि पाकिस्तानमध्ये आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सीजफायरची घोषणा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. शनिवारी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता. आता 12 मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार असल्याची माहिती मिस्त्री यांनी दिली.

दहशतवाद्यांविरोधात तडजोड नाही

एकमेकांवर गोळीबार न करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानेही युद्ध विरामाची घोषणा केली. मात्र, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नसल्याचेही पाकिस्तान यांना ठणकावून सांगितले.

फायरिंग होणार नाही

दोन्ही देशाकडून फायरिंग होणार नाही. मिल्ट्री, जमीन, हवा आणि सागरी अशा कोणत्याही मार्गाने हल्ला होणार नाही. संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांच्या बाजूने शस्त्रसंधी केली जात आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची कठोर भुमीका

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून या शस्त्रसंधीची माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक समझोता केला आहे. भारताने दहशतवादाच्या सर्व प्रकारांप्रती आणि स्वरूपांप्रती कायमच कठोर आणि तडजोड न करणारी भूमिका घेतली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group