vasai rto; वसई आरटीओत वाहन हस्तांतरणाचा घोटाळा करूनही तीन क्लार्क कर्मचाऱ्यांना अभय

Share

आरटीओ अतुल आदे एक महिन्यांपासून सुट्टीवर; कारवाई शून्य

मुंबई : (vasai rto) परिवहन विभागाच्या आरटीओ कार्यालयात घोटाळे आता काही नवीन राहिले नाही. ही बाब सामान्य झाली आहे. असाच एक धक्कादायक घोटाळा वसई आरटीओ कार्यालयात उघड झाला आहे. इतर कार्यालयाशी संबंधित आणि बँक, फायनान्स कंपन्यांनी पकडलेल्या वाहनांचे थेट मालकाच्या नावाने हस्तांतरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 1000 पेक्षा जास्त वाहनांचा समावेश असल्याचे बोलल्या जात आहे. हा घोटाळा उघड होऊनही परिवहन विभागाकडून तीनही क्लार्क कर्मचाऱ्यांना अभय दिल्या जात आहे.

हस्तांतरण केलेल्या वाहनांपैकी काहींचे नंबर “Maha Lakshvehi”च्या हाती (vasai rto)

MH48AV4852
MH48AM1053
MH48AW0604
MH48CV3751
MH48CW1962
MH48Y4730
MH48CY4145
MH48CY1861
MH01AC0452
MH48CU6540
MH48BS3730
MH48CU3143
MH04EH2088
MH04FD1545
MH04HY9757
MH48AY6729
MH48BL6484
MH48BM2497

आरटीओ आदे सुट्टीवर

याप्रकरणात आयुक्त कार्यालयाने थातूरमातूर हस्तक्षेप केला. मात्र, त्यानंतर कोणतीही कारवाई या कर्मचाऱ्यांवर झाली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार आयुक्तांनी संबंधित घोटाळ्याचा अहवाल मागितला होता. मात्र, आरटीओ अतुल आदे तातडीने सुट्टीवर गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी एक नाहीतर तब्बल तीन महिन्याच्या सुट्या टाकल्या असे कळते.

परिवहन आयुक्तांचेही दुर्लक्ष

याप्रकरणात परिवहन आयुक्त कार्यालयात तक्रारी झाल्या आहे. मात्र त्यानंतरही आयुक्तांकडून अद्याप गंभीर पद्धतीने कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे समजते. त्यामुळे आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचा या घोटाळेबाज क्लार्क कर्मचाऱ्यांना आशीर्वाद तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group