navi mumbai international airport; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील दळणवळणास चालना

Share

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात विकसित होत आहे दर्जेदार कनेक्टिव्हिटी

नवी मुंबई :  (navi mumbai international airport) सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पश्चिमेकडून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याकरिता विकसित करण्यात येत असलेल्या पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे (वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंज) काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदलाद्वारे आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

सिडकोने कनेक्टिव्हिटी प्रकल्प घेतले हाती navi mumbai international airport

“परिपूर्ण कनेक्टिव्हिटी लाभावी याकरिता सिडकोतर्फे अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्य प्रवेशमार्गांची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास थेट जोडणी होणार असल्याने त्यातील पश्चिम प्रवेश आंतरबदल आणि पूर्व प्रवेश आंतरबदल हे त्यांपैकी महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून विमानतळाकडे होणारी वाहतूक सुरळीतरीत्या पार पडणे सुनिश्चित होणार आहे.”

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा परिचालनाच्या मार्गावर असून विमानतळाला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभावी याकरिता त्या परिसराच्या परिघातील महत्त्वाच्या मार्गांना विमानतळासोबत जोडण्याकरिता परिघीय मार्गांचे नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा बंदर (पोर्ट) कनेक्टिव्हिटी कार्यक्रम हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे – विजय सिंघल,उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

एनएचएआयतर्फे या अंतर्गत आम्र मार्ग, राज्य महामार्ग-54 व राष्ट्रीय महामार्ग-4 बी यांच्या विस्तारिकरणाकरिता निधी संकलन आणि अंमलबजावणीसाठी मुंबई-जेएनपीटी पोर्ट रोड कंपनी लि. (एमजेपीआरसीएल) या विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापन करण्यात आली आहे. एमजेपीआरसीएलमध्ये एनएचएआय, जेएनपीटी आणि सिडको यांची अनुक्रमे 67.4 टक्के, 26.91 टक्के आणि 6.5 टक्के इतकी भागीदारी आहे. 

एमजेपीआरसीएलतर्फे विमानतळालगतच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास आणि विस्तारीकरणाचे काम करण्यात आले असून प्रकल्पातील भागीदार म्हणून सिडकोने या प्रकल्पाकरिता 3000 कोटी मूल्याच्या जमिनीचे योगदान दिले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता या महामार्गाचे विस्तारीकरण ही महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी ठरणार आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघातील महत्त्वाचे मार्ग आणि विमानतळ यांदरम्यान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित व्हावी याकरिता सिडकोतर्फे काही कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अटल सेतू ते विमानतळादरम्यान कनेक्टिव्हीट निर्माण करण्याकरिता उलवे किनारी मार्ग नियोजित आहे. आम्र मार्ग (राष्ट्रीय महामार्ग 348ए) आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीतरीत्या चालावी याकरिता एमजेपीरसीएलच्या प्रकल्पांतर्गत विमानतळ पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. 

त्याचप्रमाणे, विमानतळाच्या पूर्व बाजूस राष्ट्रीय महामार्ग ४बी (राष्ट्रीय महामार्ग 548ए ) सोबत कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी पूर्व प्रवेश आंतरबदल मार्गाचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्व प्रवेश आंतरबदल हा फुल क्लोव्हरलिफ प्रकारातील आहे. 

पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग हा हाफ क्लोव्हरलिफ प्रकारातील असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बहुउद्देशीय कनेक्टिव्हिचा महत्त्वाचा घटक आहे. सदर पश्चिम प्रवेश आंतरबदल हा उलवे किनारी मार्गाच्या 1.2 कि.मी.च्या उन्नत विमानतळ जोड रस्त्याला (airport elevated link road) जोडला गेला आहे. आंतरबदल मार्गावर दोन लूप आणि दोन रॅम्प यांचा समावेश आहे. आम्र मार्गावरून विमानतळाच्या दक्षिण बाजूस जाणाऱ्या वाहतुकीकरिता लूप ए व आम्र मार्गावरून विमानतळाच्या उत्तर बाजूस जाणाऱ्या वाहतुकीकरिता रॅम्प ए चा वापर करता येणार आहे. 

लूप बी आणि रॅम्प बी द्वारे विमानतळाकडून आम्र मार्गाच्या अनुक्रमे उत्तर व दक्षिणेकडे जाण्याकरिता निर्गम मार्गांचा पर्याय असणार आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग प्रकल्पा  अंतर्गत एक अतिरिक्त वाहन निम्नमार्ग आणि उलवे नदी परिवर्तित प्रवाहावरील लहान पूल यांचा समावेश आहे. जून 2025 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पश्चिम आंतरबदल मार्ग पूर्णत: कार्यान्वित होऊन वाहतुकीकरिता खुला होणे अपेक्षित आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group