पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारताने परतवले
मुंबई : (Live) पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या सीमा भागात पाकिस्तान कडून फायरिंग केली जात आहे. अशावेळी आता भारतानेही चोख उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. पठाणकोट मध्ये पाकिस्तानी जेट पाडल्याची बातमी पुढे येत आहे. जम्मू, राजस्थान आणि पंजाब मध्ये पाकिस्तानकडून ड्रोन क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहे. त्यामुळे लोकांना बंकर मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या 16 शहरांवर हल्ले
भारताकडून पाकिस्तानच्या मुख्य शहरांना टारगेट करण्यात आले आहे. त्यामध्ये 16 शहरांमध्ये भारताने हल्ले केले आहे. परिणामी पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले आहे.
एलओसीवर गोळीबार सुरू
पाकिस्तानच्या कुरापतीनंतर भारताकडून त्याचे चोख उत्तर दिले जात आहे. ज्यामध्ये एलओसीवर सुद्धा भारताच्या बीएसएफच्या जवानाकडून गोळीबार केला जात आहे.
नवी दिल्लीतील इंडिया गेट परिसर रिकामा करण्याचे सूचना
इतर वेळी रात्रीला इंडिया गेट परिसरात पर्यटकांची गर्दी असते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंडिया गेट परिसर रिकामा करण्याचे सूचना दिल्या आहे. याच मार्गावर देशाच्या सुरक्षा दलाचे मुख्यालय आहे. शिवाय पंतप्रधान कार्यालयात आणि राष्ट्रपती भवन शुद्ध असल्याने नवी दिल्ली पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून इंडिया गेट परिसराला रिकामे करून घेतले जात आहे.
क्वेटा मध्ये बलोच आर्मी आक्रमक
बलुचिस्थान परिसरात पाकिस्तानच्या अनेक कॅम्प भारताने उधळून लावले आहे. क्वेटा मध्ये भारताने दोन ब्लास्ट केले आहे. पाकिस्तान सैन्यावर जोरदार हल्ला करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानवर हल्ला
जमिन, पाणी आणि वायू अशा तीनहीभारतीय दलांकडून पाकिस्तानवर हल्ले केले जात आहे. एयर स्ट्राईक करून पाकिस्तान सैन्य आणि त्यांच्या हल्यांचा प्रयत्न परतावुन लावला आहे