Mock Drill; महाराष्ट्रभरात एकाचवेळी मॉक ड्रिल

file-photo-of-mock-drill
Share

मुंबईः (Mock Drill) महाराष्ट्रात एकाचवेळी गुरूवारी 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. मुंबईत दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल घेतले जाणार आहे. महाराष्ट्रातील 3 शहर ही सुरक्षेच्या दृष्टीने अतीसंवेदनशील आहेत. मुंबई कॅटेगिरी एकमध्ये तर ठाणे, पुणे आणि नाशिक हे कॅटेगिरी दोनमध्ये आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्यामुळे भारत-पाकिस्तान देशांमध्ये तणाव (Mock Drill)

भारत – पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात उद्या 295 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यात महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. यात कॅटेगिरी एकमध्ये मुंबई, उरण आणि तारापुरचा समावेश आहे.

कॅटेगिरी दोनमध्ये ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सिन्नर, मनमाडचा समावेश आहे. संभाजीनगरचा समावेश कॅटेगिरी तीनमध्ये केला आहे. भुसावळचा देखील यात समावेश आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यालगतचा भाग देखील कॅटेगिरी तीनमध्ये आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group