Bhaurao Chavan Karkhana; देशासह जगाची प्रगती कामगार, कर्मचारी, कष्टकरी शेतकर्‍यांवर अवलंबून

Nanded
Share

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यातील कामगार-कर्मचारी सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न

नांदेडः (Bhaurao Chavan Karkhana) जगातील कोणत्याही देशाची प्रगती ही कामगार, कर्मचारी, कष्टकरी शेतकर्‍यांच्या मेहनतीवर अवलंबून आहे. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात. पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर तरली नसून ती कामगार, कष्टकरी, शेतकर्‍यांच्या तळहातावर तरली आहे. त्याप्रमाणेच मारोती रेणेवाड, नारायणराव बत्तलवाड यांनी आपल्या सेवेमध्ये कारखान्यात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून खूप मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड यांनी केले.

Nanded Bhaurao chavan sugar mill degaon
Nanded Bhaurao chavan sugar mill degaon

सेवापुर्ती कार्यक्रम धुमघडाक्यात संपन्न (Bhaurao Chavan Karkhana)

भाऊराव चव्हाण सहकारी साकर कारखान्याचे कामगार मोराती रेणेवाड व कर्मचारी नारायण बत्तलवाड यांचा सेवापुर्तीनिमीत्त सत्कार कार्यक्रम थाटात पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

सेवापूर्ती निमित्त सत्कार

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना प्रा.लि. देगाव -येळेगाव जिल्हा नांदेड येथील दोघांना58 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त करण्यात आली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यातील नागेश्वर मंदिर प्रांगणात अधिकारी, कामगार, कर्मचारी यांच्यावतीने दोघांचाही सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला.

सर्वप्रथम कारखान्याचे इंजिनिअर ऋषिकेश गड्डपवार, अजय कदम, डी.आर.जाधव, रोहन देशमुख, प्रकाश कावडकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, पुष्पहार देऊन दोन्ही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा शुभेच्छा देण्यात आल्या.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group