घरांची पडझड; जनावरांचा झाला मृत्यू
गोंदिया : (vidarbha avkali paus) गोंदिया जिल्ह्याला वादळी वाराच्या तडाखा बसला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वारा सुरू झाला आणि अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे झाडे ही पडलेली असून विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वादळी पावसात जनावरांचा मृत्यू (vidarbha avkali paus)
कट्टीपर येथील मेंढे परिवाराच्या घराचे छप्पर उडाल्याने संपूर्ण परिवार उघड्यावर आले आहे. तर विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिकांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.