Phule movie;’फुले” चित्रपट टॅक्स फ्री करावा

Ramdas Athawale
Share

राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंतर आता, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही मागणी

मुंबईः (Phule movie) महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे. त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री करण्याची मागणी आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

Fule
Mahatma Fule

अंधेरीत फुले सिनेमांचे झाले स्क्रिंनींग (Phule movie)

अंधेरीत रामदास आठवले यांच्यासाठी फुले सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग दाखवण्यात आले. फुले चित्रपट पाहिल्यानंतर रामदास आठवले यांनी हा चित्रपट देशभरात पोहोचला पाहिजे. त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा आणि फुले या चित्रपटाला करमुक्त करावे अशी आपली मागणी असून त्या बाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा रिपाआयचे शैलेशभाई शुक्ला, सिद्धार्थ कासारे, जतीन भुट्टा, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

अधिक वाचा – https://mahalakshvedhi.com/mahatma-fule-tax-free-jayant-patil-ncp/

महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले हा सिनेमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात दाखवण्यात यावा अशी विनंती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रामदास आठवले यांना केली. त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिली. तर फुले सिनेमा सर्व सिनेमागृहात दाखवण्यात यावा. सर्वांनी फुले सिनेमा जरूर पाहावा असे आवाहन सुद्धा यावेळी आठवले यांनी केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group