wardha collector;वर्धा जिल्ह्यात रेती वाहतुकीवर कारवाई;रेती घाटावर का नाही ?

Share

मुंबई : (wardha collector) वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर जाऊन महसूल अधिकारी आणि रेती माफियांचे अवैध रेती उपसा करण्याचे मधुर सबंध उघड केल्याने, महसूल अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशा परिस्थितीत आम्ही कसे आणि किती प्रामाणिक आहे. हे दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर महसूल कर्मचाऱ्यांनी तब्बल 9 वाहन पकडली खरी, मात्र प्रत्यक्षात ज्या रेती घाटावरून रात्रंदिवस अवैध रेती उपसा केला जातो तिथे अद्याप कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महसूल अधिकाऱ्यांचेच रेती माफियांसोबत साटेलोटे (wardha collector)

महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई करत पहाटे 4 वाजेच्या सुमारास कुटकी येथे नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अवैधपणे रेती वाहतूक करणाऱ्या 9 ट्रक वर कारवाई केली. कारवाईत नऊही ट्रक जप्त करून तहसील कार्यालय हिंगणघाट येथे जमा करण्यात आले. मात्र रेती तस्करांच्या मुळाशी अद्याप महसूल विभाग गेले नाहीत. मुळाशी म्हणजेच थेट रेती घाटावर जाऊन माफियांना रेड हैंड पकडायची कारवाई महसूल अधिकारी का करत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असतांना, अधिकाऱ्यांचे माफियांसोबत साटेलोटे असल्याची चर्चा सुरू आहे.

शेकापूर बाई, दारोडा घाटावरून रेतीची लूट 

सूत्रांच्या माहितीवरून जप्त केलेले ट्रक हे शेकापूर आणि दारोडा या घाटावरून अवैध रित्या वाहतूक करत होते. रात्री जेसीबी आणि पोकलेन च्या माध्यमातून कोट्यवधीची रेती वाहतूक केली जाते. महसूल विभागाने ट्रक विरोधातल्या कारवाईसह अवैध रेती घाटावरही धाड  सत्र राबवण्याची गरज आहे. दारोडा आणि शेकापूर या घाटावरून कोट्यवधीच्या रेती उत्खनन झाले असून अजूनही मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. 

महसूल अधिकाऱ्यांचे डोळेझाक 

शेकापुर या घाटावरून अवैध रित्या उत्खनन होत आहे. त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. इथे मोठ्या प्रमाणात जेसीबी आणि पोकलेनच्या माध्यमातून रेती उत्खनन केले जात आहे. त्याकडे प्रशासनाचे मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या घाटावरून भाजपाच्या पदाधिकारीच रेती तस्करी करत आहे. स्थानिक आमदार समीर कुणावर यांचा वरदहस्त असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याच सांगितले जात आहे. 

आमदारांना दिसते ते महसूल अधिकाऱ्यांना का दिसत नाही ?

दोन दिवसांपूर्वी विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील अवैध रेती साठ्यावर हल्ला बोल केला. स्थानिक नागरिक, आमदारांना अवैध साठे दिसतात पण महसूल विभागाला का दिसत नाही हा मोठा प्रश्न आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group