महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना
मुंबई : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून, परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या असल्याची माहिती राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने, तसेच विविध भारतीय दूतावासांनी २४×७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केले असून, राज्य शासन या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे, तसेच दूतावासाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये
मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच स्थानिक घडामोडींवर लक्ष ठेवावे. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. भारतीय नागरिकांनी शांतता राखून परिस्थितीबाबत जागरूक राहावे आणि पुढील अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी.
राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (एसईओसी) २४×७ सुरु
परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती देण्यासाठी अथवा आपत्कालीन मदतीसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्र २४×७ सुरु राहणार आहे. नागरिकांनी फोन १०७७ (टोल फ्री) फोन +९१-९३२१५८७१४३ दूरध्वनी : ०२२-२२०२७९९० ई-मेल : [email protected] यावर संपर्क साधावा.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय गल्फ व मध्य-पूर्व देशांतील भारतीय दूतावासांचे देशनिहाय आपत्कालीन संपर्क क्रमांक- कतार (दोहा) फोन : ००९७४-५५६४७५०२ / ००९७४-५५६४७५०३, ई-मेल : [email protected]
संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी / दुबई) – टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१-५४३०९०५७१, ई-मेल : [email protected], ई-मेल : [email protected]
सौदी अरेबिया (रियाध / जेद्दाह) – फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप (फक्त) : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : [email protected]
बहरीन (मनामा) – फोन : ००९७३-३९४१८०७१
कुवैत फोन : +९६५-६५५०१९४६ (२४×७ आपत्कालीन), ई-मेल : [email protected]
ओमान (मस्कत)- कम्युनिटी टोल फ्री : ८००७१२३४,व्हॉट्सॲप : +९६८-९३५७७९७९,
कॉन्सुलर हेल्पलाईन : २४६९५९८१
इराण (तेहरान)- फोन : +९८-९१२-८१०-९११५, फोन : +९८-९१२-८१०-९१०९, फोन : +९८-९१२-८१०-९१०२,
फोन : +९८-९९३-२१७-९३५९
इस्रायल (तेल अवीव)– फोन : +९७२-५४-७५२०७११, फोन : +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.[email protected]
जॉर्डन (अम्मान)– फोन : ००९६२-७७०४२२२७६(तातडीने देश सोडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे)
पॅलेस्टाईन (रामल्लाह)– फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : [email protected]
परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- सुरक्षित ठिकाणीच वास्तव्यास राहावे व अनावश्यक हालचाल टाळावी
- भारतीय दूतावास व वाणिज्य दूतावासांच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे
- आपले सध्याचे लोकेशन व परिस्थिती कुटुंबीयांना नियमित कळवावी मोबाईल फोन पूर्ण चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत
- सोशल मीडियावरील अफवा व अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये
- संबंधित दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे
महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे संयुक्तपणे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कार्यरत आहे. आवश्यक मदत, माहिती समन्वय तसेच परिस्थितीनुसार स्थलांतराची (इव्हॅक्युएशन) तयारी सुरू असल्याचे आपत्कालीन कार्य केंद्राचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
